सागर जगदाळे
भिगवण : येथील भैरवनाथ हायस्कूल येथे रोटरी क्लब पुना वेस्ट व रोटरी क्लब भिगवन यांच्या संयुक्त विद्यमाने RYLA चे आयोजन करण्यात आले. या अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी Teamwork, Personality development तसेच Communication skill यावर श्री हरेंद्र देशपांडे (कॉर्पोरेट ट्रेनर), श्री.मिलिंद पटवर्धन (कॉर्पोरेट ट्रेनर) व सौ. स्वप्ना मोडक यांनी मुलांना मार्गदर्शन केले.
यावेळी रोटरी क्लब पुन्हा वेस्ट च्या प्रेसिडेंट सौ.भाग्यश्री भिडे, तसेच सेक्रेटरी श्री दिलीप दोंदे, सौ. कल्याणी गोखले, सौ. सुचित्रा भावे, श्री. मोहन अंगाडी, श्री. नरेंद्र देशपांडे, श्री.अनिल सप्रे, श्री. मिलिंद पटवर्धन, तसेच रोटरी क्लब भिगवन चे अध्यक्ष डॉ. अमोल खानावरे, माजी अध्यक्ष श्री संजय खाडे, श्री सचिन बोगावत, सेक्रेटरी श्री संतोष सवाने, श्री संजय चौधरी, श्री तुषार क्षिरसागर इत्यादी उपस्थित होते.
यावेळी बोलताना सौ भाग्यश्री भिडे मॅडम म्हणाल्या की, आत्ताच्या काळात विद्यार्थ्यांमध्ये पुढे जाऊन टीमवर्क तसेच पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ची जास्त गरज आहे ही गरज ओळखून आम्ही हा RYLA भिगवन येथे आयोजित केला होता.
रोटरी क्लब भिगवन चे अध्यक्ष डॉ अमोल खानावरे म्हणाले की, आत्ताच्या स्पर्धेच्या युगात तसेच कोरोनाच्या नंतरचा काळामध्ये मुलांमध्ये विविध विषयांवरती कम्युनिकेशन स्किल तसेच त्यांचे कलागुण दाखवण्यासाठी प्रोत्साहन मिळावे याची जागृती होण्यासाठी याचा नक्कीच फायदा होईल.
माजी अध्यक्ष संजय खाडे म्हणाले की, दोन वर्ष लॉक डाऊन मध्ये शाळा बंद होत्या तसेच आत्ताचे युग स्पर्धेचे युग मानले जाते यामध्ये ग्रामीण विद्यार्थ्यांचा टिकाव लागण्यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचे नियोजन भैरवनाथ हायस्कूलचे प्राचार्य श्री गावडे सर व त्यांचा सर्व स्टाफ यांनी केले.