Pune Camp News | पुणे : कॅम्पमधील ( Pune Camp ) रोझरी एज्युकेशन ग्रुपचे संचालक विनय अऱ्हाना आणि त्यांचे बंधू विवेक अऱ्हाना यांची ४७ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सोमवारी जप्त केली.
कॉसमॉस बँकेत बनावट कागदपत्रे देऊन कर्ज घेऊन बँकेची फसवणूक…
कॉसमॉस बँकेत बनावट कागदपत्रे देऊन कर्ज घेऊन बँकेची फसवणूक केल्या प्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे. अटॅच करण्यात आलेल्या मालमत्तांमध्ये रोझरी एज्युकेशन ग्रुपची जमीन आणि शाळेच्या इमारतीचा आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मालकीच्या जागेचा समावेश आहे.
विनय अऱ्हाना यांनी शाळेच्या नूतनीकरणासाठी कॉसमॉस बॅंकेतून २० कोटी ४४ लाख रुपयांचे कर्ज घेतले. परंतु बनावट कागदपत्रांच्या आधारे घेऊन ही रक्कम नूतनीकरणासाठी न वापरता अपहार केला, अशी फिर्याद बँकेचे अधिकारी शिवाजी काळे यांनी दिली होती.
त्यावरून रोझरी स्कूलचे संचालक विनय अऱ्हाना, विवेक अऱ्हाना यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाचा समांतर तपास ‘ईडी’कडून करण्यात येत होता.
दरम्यान, ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांनी २८ जानेवारी रोजी त्यांच्या मालमत्तेवर छापे टाकून त्यांची चौकशी केली. त्यानंतर ‘ईडी’ने १० मार्च रोजी विनय अऱ्हाना यांना अटक केली होती. मुंबईतील विशेष न्यायालयाने त्यांची २० मार्चपर्यंत ‘ईडी’च्या कोठडीत रवानगी केली आहे.
विनय अऱ्हाना आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या जप्त केलेल्या मालमत्तेचे बाजारमूल्य ९८ कोटी २० लाख रुपये इतके आहे, अशी माहिती ‘ईडी’ने जारी केलेल्या पत्रकाद्वारे दिली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…