सुरेश घाडगे
परंडा : भाजपचे आमदार प्रशांत बंब यांच्या वक्तव्याचा परंडा तालुका शिक्षक संघाच्या वतीने गुरुवार ( दि. २५ ) जाहीर निषेध करण्यात आला आहे.
शिक्षक संघाच्या वतीने परंडा तहसिलदार रेणुकादास देवणीकर व परंडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले. यावेळी तालुका संघाचे अध्यक्ष शिवाजी शिंदे , शाहीर शरद नवले , दैवान पाटील,जयदेव गंभीरे,शिवाजीराव पंडित,अरुण पाटील,सर्जेराव ठोकळ,मुबारक पठाण, रवी कापसे,विजयकुमार माळी, तानाजी मिसाळ,आदिकराव शेळवणे उपस्थित होते.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार प्रशांत बंब यांनी राज्यातील जिल्हा परिषद शाळांच्या गुणवत्तेबद्दल त्यांच्या वक्तव्यातून अविश्वास दाखविला आहे. राज्यातील सर्व शिक्षक प्रामाणिकपणे व निष्ठेने आपले दैनंदिन शैक्षणिक कामकाज पार पाडत आहेत. तसेच शैक्षणिक कामे प्रतिकूल परिस्थितीतही पार पाडत असतात.
दरम्यान, शुक्षकांना इतर अशैक्षणिक कामाचा बोजा असताना देखील शैक्षणिक कर्तव्य बजावत आहेत. आणि आमदार बंब यांनी शिक्षकांबद्दल अविश्वास दाखविला आहे. त्यामुळे आम्ही परंडा शिक्षक संघाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला आहे. असे निवेदनात म्हटले आहे.