लहू चव्हाण
Pachgani News | पाचगणी : खिंगर (ता.महाबळेश्वर) येथील जिल्हापरिषद शाळेतील आदर्श, होतकरू, उपक्रमशील शिक्षिका रेहाना अबिद भालदार यांची जिल्हा अंतर्गत बदली झाल्याने त्यांचा निरोप समारंभ महाबळेश्वर पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी आनंद पळसे यांच्या उपस्थित संपन्न झाला.
यावेळी स्नेहल जोशी मॅडम, पंचायत समितीचे विषयतज्ञ कुलदीप अहिवळे, खिंगर गावचे सरपंच दिनकर मोरे, तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष अशोक दुधाणे, ग्रामपंचायत सदस्या प्रियंका भिलारे, सुरेखा पवार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन दुधाणे, उपाध्यक्षा हर्षाली दुधाणे आदी मान्यवर उपस्थित होते.
शिक्षिका रेहाना यांनी सलग पाच वर्ष खिंगर जि.प.प्राथमिक शाळेत विविध उपक्रम राबविण्यात नेहमीच अग्रेसर राहिल्या. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणात नेहमीच उत्कृष्ट मार्गदर्शन करण्यात प्रभावी भूमिका बजावली.
जि.प.प्राथमिक शाळा खिंगर ही शाळा सन २०२३/२०२४मध्ये आदर्श शाळा करण्यासाठीच रक्कम रू.५००० चा रोख धनादेश अध्यक्ष शाळाव्यवस्थापन समिती खिंगर यांना देणाऱ्या रेहाना अबिद भालदार यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. तसेच खिंगर शाळेत नवीन बदलीने रूजू झालेल्या शिक्षिका रूपाली दत्तात्रय इथापे यांचे स्वागत करण्यात आले.