Mumbai News : मुंबई : आपल्या देशात आधारकार्ड हा स्वत:ची ओळख दाखविण्यासाठी महत्वाचा दस्तावेज मानला जातो. सरकारी असो वा खासगी कोणत्याही कंपनीत आधार कार्ड हे मुख्य डॉक्युमेंट मानले जाते. या आधारकार्ड संदर्भात धक्कादायक बातमी समोर आली आहे. राज्यातील तब्बल १४ लाख ९० हजार ५४५ विद्यार्थ्यांचे आधारकार्ड अवैध असल्याचे समोर आले आहे.
विधान परिषदेतील लेखी उत्तरात सरकारने दिली माहिती
राज्य सरकारने विधान परिषदेत लेखी उत्तरात विद्यार्थ्यांच्या अवैध आधारकार्डबाबत माहिती दिली आहे. राज्य सरकारने विधानपरिषदेत दिलेल्या माहितीनुसार राज्यातील २ कोटी ११ लाख ४४ हजार ४६७ विद्यार्थ्यांपैकी १ कोटी ९३ लाख ४५ हजार १११ विद्यार्थ्यांचे आधार कार्ड वैध ठरले आहेत. (Mumbai News) तर १४ लाख ९० हजार ५४५ विद्यार्थ्यांचे आधारकार्ड अवैध ठरले आहेत.
दरम्यान, राज्य विधिमंडळाच्या तीन आठवड्यांच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन सरकारला धारेवर धरलं होतं.(Mumbai News) मात्र, काही वेळातच अधिवेशनाचा पहिली दिवस आटोपता घेण्यात आला. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी दोन्ही सभागृहांचे कामकाज आरोप-प्रत्यारोपांनी व्यापल्याचे दिसत आहे. याचवेळी विधान परिषदेत लेखी उत्तरात हा मुद्दा उपस्थित करण्यात आला.
दरम्यान, यावेळी बोलताना मंत्री दीपक केसरकर यांनी म्हणाले की, विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अवैध ठरले तरी त्या विद्यार्थ्यांना शासकीय योजनांपासून वंचित ठेवता येणार नाही. या विद्यार्थ्यांना आधारकार्ड मिळवू देण्यासाठी यंत्रण उपलब्ध करून देण्यात आली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Mumbai News : तुम्ही सोमय्यांची ईडी, सीबीआय चौकशी करणार का? भास्कर जाधवांचा रोख कोणाकडे?
Mumbai News : माझ्याकडे सोमय्यांचे अनेक व्हिडीओ; पेन ड्राइव्ह घेऊनच सभागृहात जातोय; दानवेंचा इशारा!