Mumbai News : मुंबई : राज्यात सर्वदूर मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. राज्याच्या अनेक भागांमध्ये यापुढेही काही दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर दहावी बोर्डाचा पुरवणी परीक्षेचा आजचा पेपर रद्द करण्यात आला आहे. बोर्डाच्या सचिव अनुराधा ओक यांनी याबाबत माहिती दिली आहे.
बोर्डाकडून प्रसिद्धी पत्रक जारी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षा घेतल्या जात आहेत. १८ जुलै ते १ ऑगस्ट २०२३ या कालावधीमध्ये दहावीची पुरवणी परीक्षा तर १८ जुलै ते १० ऑगस्ट २०२३ या कालावधीत बारावीची पुरवणी परीक्षा होत आहे. (Mumbai News) या पुरवणी परीक्षासंबंधीचे वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर देखील प्रसिद्ध करण्यात आले आहे.
मात्र, राज्यातील काही जिल्ह्यांना आज अतिवृष्टीचा इशारा दिल्याने बोर्डाकडून आजचा दहावीचा पेपर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Mumbai News) यासंदर्भात बोर्डाकडून एक प्रसिद्धीपत्रक देखील जारी करण्यात आले आहे.
दरम्यान, आजचा रद्द झालेला पेपर आता सुधारीत वेळापत्रकानुसार गुरुवारी (ता. ३ ऑगस्ट) सकाळी अकरा ते दुपारी एक वाजण्याच्या सुमारास होणार आहे. (Mumbai News) आज दहावीचा इतिहास आणि राज्यशास्त्राचा पेपर होता; मात्र अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे आता हा पेपर पुढे ढकलण्यात आला आहे. याबाबत बोर्डाकडून एक प्रसिद्धी पत्रक देखील जारी करण्यात आले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Mumbai News : मोठी बातमी! मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर आज पुन्हा दोन तासांचा ब्लॉक!