MIT News पुणे : सहावी राष्ट्रीय इनडोअर चॅम्पियनशिप 10 ते 14 ऑगस्ट दरम्यान पुण्यात होणार आहे. या स्पर्धेचे आयोजन लोणी काळभोर येथील एमआयटी-एडीटी विद्यापीठात होणार असल्याची माहिती महाराष्ट्र रोईंग असोसिएशनने नुकतीच दिली. (MIT News)
भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या व्हाईस प्रेसिडेंट तसेच रोईंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षा राजलक्ष्मी सिंह देव यांच्या मार्गदर्शनात होणाऱ्या या स्पर्धेत देशभरातील सर्वोत्तम रोईंग चॅम्पियन्स या स्पर्धेत खेळताना आपल्याला दिसणार आहेत. या स्पर्धेच्या आयोजनात रोईंग असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी एम. व्ही. श्रीराम आणि खजिनदार नवाबुद्दीन अहमद हेदेखील महत्वाची भूमिका बजावत आहेत. (MIT News)
या स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माईर्स-एमआयटीचे संस्थापक विश्वधर्मी प्रा. डाॅ. विश्वनाथ दा. कराड हे असतील. तसेच या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून एमआयटी-एडीटी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डाॅ. मंगेश तु. कराड असणार आहेत. ही स्पर्धा पुणे तसेच पश्चिम भारतात रोईंग खेळाच्या विकासासाठी एक मैलाचा दगड ठरणार आहे. (MIT News)
या राष्ट्रीय स्पर्धेत देशभरातील विविध राज्यांचे तब्बल 500 रोवर्स सहभागी होणार आहेत. स्पर्धेत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पंच आपला निकाल देणार आहेत. या कार्यक्रमाला पद्मश्री कॅप्टन बजरंगलाल तखर यांच्यासह स्मिता शिरोळे यादव, मेजर इस्माईल बेग, कॅप्टन राजेंद्र शेळके, दत्तू भोकनळ आणि मेजर स्वर्ण सिंग हे रोईंगच्या खेळातील दिग्गज उपस्थित राहणार आहेत. एमआयटी-एडीटी विद्यापीठात स्थापित प्रा. डाॅ. विश्वनाथ कराड स्पोर्ट्स ऍकॅडमीमध्ये सर्वच खेळांसाठी अत्यंत अत्याधुनिक सुविधा आज उपलब्ध आहेत.
पुण्याला रोइंगचा समृद्ध इतिहास : प्रा. फड
या स्पर्धेच्या आयोजनावर बोलताना क्रीडा संचालक प्रा. पद्माकर फड म्हणाले की, पुण्याला रोइंगचा समृद्ध इतिहास आहे आणि एमआयटी एडीटी विद्यापीठाने महाराष्ट्र रोईंग असोसिएशनमध्ये अनेक राज्य आणि राष्ट्रीय पदके मिळवून महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
एमआयटी-एडीटी नेहमीच उत्तम मंच उपलब्ध करून देते : डॉ. भोयर
असोसिएट डायरेक्टर स्टुडंट अफेअर्स प्रा. डॉ. सुराज भोयर यांनी सांगितले की, विविध राष्ट्रीय आणि प्रादेशिक चॅम्पियनशिपचे आयोजन करून, क्रीडाप्रेमींना त्यांच्या कलागुणांचे प्रदर्शन करण्यासाठी एमआयटी-एडीटी नेहमीच एक उत्तम मंच उपलब्ध करून देत असते. विविध खेळांसाठी समर्पित डॉ. विश्वनाथ कराड स्पोर्ट्स अकादमी भारताला क्रीडा क्षेत्रात महासत्ता बनवण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे. या माध्यमातून आम्ही भविष्यातील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खेळाडू घवडत असल्याचेही ते म्हणाले. ही स्पर्धा बघण्यासाठी जास्तीत जास्त क्रीडा प्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहनही एमआयटी-एडीटी विद्यापीठाच्या वतीने करण्यात आले आहे.