लोणी काळभोर : दिल्ली येथे असोचेम द्वारे आयोजित एज्युटेक समिट 2022 मध्ये लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाला डिजीटल उपक्रम, डिजिटलायझेशन कडे वाटचाल आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर यासाठी सर्टिफिकेट ऑफ एक्सलन्स अवार्डने सन्मानित करण्यात आले.
एमआयटी एडीटी विद्यापीठाची निवड डिजिटलायझेशनसाठीचे शैक्षणिक आणि तंत्रज्ञान धोरण तसेच सर्वसमावेशक तंत्रज्ञान फ्रेमवर्कच्या आधारे करण्यात आली. कोविड आणि कोविड नंतरच्या काळात शिक्षणातील डिजिटलायझेशनच्या दिशेने उचललेल्या पावलांसाठी या शिखर परिषदेने देशभरातील शीर्ष १०० संस्थांची यादी प्रदर्शित केली. असोचेमने निवडलेल्या या १०० हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट (HEI) मध्ये एमआयटी एडीटी विद्यापीठाचा समावेश होता.
एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष आणि कुलगुरू प्रा.डॉ. मंगेश कराड म्हणाले की, भारतातील डिजिटल उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी एमआयटी एडीटी विद्यापीठ नेहमीच प्रयत्नशील असते. भारतातील डिजिटल डिव्हाईड कमी करण्यात मदत करणाऱ्या डिजिटल उपक्रमांचा विकास आणि अंमलबजावणी करण्याच्या विद्यापीठाच्या वचनबद्धतेला हा पुरस्कार मिळाला आहे.
दरम्यान, एमआयटी एडीटी विद्यापीठ गेल्या ५ वर्षांपासून डिजिटल परिवर्तन उपक्रमांमध्ये आघाडीवर आहे. कार्यशाळा, परिसंवाद आणि परिषदांद्वारे विद्यापीठ आपल्या विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्यामध्ये डिजिटल जागरूकता सक्रियपणे प्रोत्साहित करत आहे. असोचेमद्वारा करण्यात आलेला हा सन्मान डिजिटल परिवर्तनासाठी विद्यापीठाच्या वचनबद्धतेचा दाखला आहे. विद्यापीठ आणि आमच्या विद्यार्थ्यांसाठी हा एक मोठा सन्मान आहे.
असोचेम द्वारा मिळालेल्या या पुरस्काराबद्दल एमआयटी एडीटी विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. अनंत चक्रदेव, कुलसचिव डॉ. महेश चोपडे एमआयटी कॉलेज ऑफ मॅनेजमेंटच्या संचालिका डॉ. सुनिता मंगेश कराड, एमआयटी स्कूल ऑफ इंजीनियरिंगचे डीन आणि डायरेक्टर यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.