Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी स्टेशन येथील मेडिकल दुकानामधून कोल्ड्रिंक्स, चिप्सची जोरदार विक्री सुरु ; मेडिकलच्या शेजारी नामांकित कॉलेजमधील तरुण व तरुणींच्या दररोज रात्री रंगतात दारूच्या पार्ट्या…!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 15 December 2022, 16:32

विशाल कदम

लोणी काळभोर : लोणी स्टेशन येथील एका मेडिकल दुकानामधून कोल्ड्रिंक्स, चिप्सची विक्री रात्री अकरानंतर जोरदार सुरु आहे. लोणी काळभोर येथील एका नामांकित कॉलेजमधील तरुण व तरुणी चक्क ११ नंतरही दररोज मेडिकलमध्ये गर्दी करताना आढळून येत आहेत. तसेच, मेडिकलच्या शेजारीच उघड्यावर बसून दररोज रात्रीच्या दारूच्या पार्ट्या करत असल्याचे दिसून येत आहे.

अन्न व औषध प्रशासन विभागाचे  सहआयुक्त एस. बी. पाटील यांनी ११ फेब्रुवारी २०२२ रोजी काढलेल्या परिपत्रकात मेडिकल चालकांनी मेडिकलमधून गोळ्या औषधांव्यतिरिक्त इतर अन्न पदार्थ विक्री करू नये, अन्यथा विक्री करताना आढळल्यास किंवा दिलेल्या सूचनांचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई करणार असा कडक इशारा दिला होता. मात्र, मेडिकल चालकांनी शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखविली असून, राजरोसपणे अन्नपदार्थांची विक्री केली जात आहे. मेडिकल चालकाने उपस्थित राहून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नमूद केलेल्या यादीप्रमाणे गोळ्या व औषधे देणे बंधनकारक आहे. मात्र मेडिकलचालक दुसऱ्याच गोष्टीना प्राधान्य देत आहेत.

 

पुणे – सोलापूर महामार्गावरील पूर्व हवेलीतील कदमवाकवस्ती, लोणी काळभोर व उरुळी कांचन परिसरात १५० व त्यापेक्षा लहान व मोठी मेडिकल दुकाने आहेत. यामध्ये काही गावांमधील मेडीकल दुकाने ही अत्यावश्यक सेवेसह रात्री ११ वाजेपर्यंत सुरु असतात तर काही मेडिकल २४ तास सुरु असतात. लोणी स्टेशन येथील एका मेडिकल दुकानामधून आईसक्रीम, चॉकलेट्स, शीतपेय, आईस्क्रीम आणि चिप्सची विक्री रात्री अकरानंतरही जोरदार सुरु असते. सदर मेडिकलमधून विद्यार्थी कोल्ड्रिंक्स आणि चिप्स घेऊन पहाटेपर्यंत शेजारील परिसरात मद्यपान करतात.

सदर परिसरात हॉस्पिटल असल्याने येथे रुग्ण व नातेवाईकांनी ये-जा चालू असते. तरुण-तरुणी मद्यपान केल्यानंतर रस्त्यावरच आरडाओरडा करून धिंगाणा घालतात. रस्त्याच्या मध्यामागीच वाहने लावतात. त्यामुळे ही मेडिकल दुकाने आहेत का किराणा मालाची दुकाने असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. त्यामुळे अशा मेडिकलवर अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई करण्याची मागणी नागरिक करू लागले आहेत.

दरम्यान, पुणे येथील अन्न व औषध प्रशासन विभागाकडून मेडिकल दुकानदारांना परवाना मिळतो, परंतु अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी या प्रकारच्या मेडीकल दुकानदारांवर कारवाईचा बगडा का उचलत नाहीत ? परवानाधारक कर्मचारी नियुक्त आहेत का नाही याचीही चौकशी करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.

एकंदरीत या सर्व प्रकाराने ग्रामस्थ हैराण झाले असून या प्रकारांकडे पोलीस देखील कानाडोळा करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हे मेडिकलचालक शासकीय नियम हे धाब्यावर बसून आपल्या व्यवसाय रेटत असल्याचे चित्र परिसरात दिसून येत आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07

पुणे पोलिसांचा ‘सिंघम’ अवतार! गुंडाच्या हॉटेलवर चालवला बुलडोझर; आर्थिक रसद तोडल्याने गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले

Thursday, 2 July 2026, 20:30

‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ चित्रपटावर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया; म्हणाल्या “पात्र साकारण्यासाठी माझी परवानगी…”

Thursday, 2 July 2026, 19:47
Next Post

अजब प्रेम कि गजब कहाणी..!! प्रेमास नकार दिल्याने अल्पवयीन प्रियसीच्या घरात घुसून कोयत्याने वार; फुरसुंगी येथील घटना...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.