गणेश सुळ
Kedgaon News : केडगाव ता.२७ दौंडचे आमदार राहुल कुल यांनी पावसाळी अधिवेशनात नुकतेच प्रकाश शेलार यांनी एरंडवणे येथे उपशिक्षक असताना राबवलेला वॉटर बेल या उपक्रमासाठी सर्वाचे लक्ष वेधले होते. यांची सर्व प्रसार माध्यमांनी प्रसिध्दी केली आहे. यावर राज्यभरातून हजारो कमेंट्स येत आहेत.(Kedgaon News)
वॉटर बेल या उपक्रमासाठी सर्वाचे लक्ष वेधले होते.
राज्यातील शाळांमध्ये असलेली मुले शाळेत पाणी पित नसल्याचे अनेक सर्वेशनातून समोर आले होते. पालकांचेही तसे म्हणणे आहे. यासाठी शिक्षक प्रकाश शेलार यांनी सन २०१९ साली वॉटर बेल हा उपक्रम राबवण्यात यावा असा प्रस्ताव सादर केला होता. त्यावरती २०२० साली अमलबजावणी देखील झाली. संपूर्ण महाराष्ट्रात हा उपक्रम राबवण्यात आला.(Kedgaon News)
परंतु, कोरोनाच्या पार्श्र्वभूमिवर शाळा बंद असल्याने याचां सर्वत्र विसर पडला आहे. यासाठी आमदार राहूल कुल यांनी या उपक्रमाचा अहवाल शालेय शिक्षण आयुक्त यांनी सर्व शाळांमध्ये सादर करून लवकरात लवकर या उपक्रमाची अंमलबजावणी व्हावी यासाठी अधिवेशनात सर्वाचे लक्ष वेधले.(Kedgaon News)
मुले शाळेत दिवसातील ५ ते ७ तास असतात. या काळात त्यांना दीड ते दोन लीटर पाणी पिणे आवश्यक असते. मात्र, मुलांना पाणी पिण्याची सवय नसते. त्यामुळे विद्यार्थ्यांना पाणी पिण्याची सवय लागावी म्हणून शाळेच्या वेळापत्रकात आता तीन वेळा वॉटर बेल वाजवण्याची वेळनिश्चिती करण्यात यावी. असे निर्देश शालेय शिक्षण विभागाकडून सर्व शाळांना देण्यात आले आहेत. परंतु कोरोनाच्या काळात याकडे दुर्लक्ष केले गेले आहे.(Kedgaon News)
शाळेतील अनेक विद्यार्थी घरातून नेलेल्या पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या अनेकदा तशाच घरी आणतात आणि दिवसभरात शाळेत खूप कमी पाणी अनेक विद्यार्थी पीत असल्याचं निदर्शनास आले. तेव्हा शाळेमध्ये पाणी पिण्याची आठवण करुन देण्यासाठी शाळेच्या वेळापत्रकातच तीन वेळा वॉटर बेल वाजवण्याची वेळनिश्चिती केली जावी. असे प्रतिपादन दौंड विधानसभा सदस्य राहुल कुल यांनी अधिवेशनात केले.(Kedgaon News)
दरम्यान, मुख्याध्यापकांनी शाळेच्या वेळापत्रकात वॉटर बेलसाठी वेळनिश्चिती केल्यानंतर पाणी पिण्याची मुलांची मानसिकता आपोआपच निर्माण होईल आणि पुढे तिचं सवयीत रुपांतरही होईल.(Kedgaon News)
वजन, उंची, वयानुसार मुलांनी रोज दीड ते दोन लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. मुलांना दिवसातील पाच ते सात तासाचा कालावधी शाळेत जातो .या कालावधीत शरीराला पाण्याची अनेकदा गरज असूनही अभ्यास,खेळ यामुळें अनेक विद्यार्थी पाणी पित नाहीत.परंतु या उपक्रमाने त्यांना पाणी पिण्याची मानसिकता आपोआपच निर्माण होईल व पुढे त्यांचे सवयीत रूपांतर होईल.(Kedgaon News)
प्रकाश शेलार सर (वॉटर बेल उपक्रम निर्माते)