पुणे : JEE Exam Result : जेईई मुख्य परीक्षेचा 2022 सेशन 1 चा निकाल नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (NTA) जाहीर झाला आहे. या परीक्षेत पात्र ठरण्यासाठी सर्वसाधारण गटातील उमेदवारांसाठी ७५ टक्के गुण तर एसीसी, एसटी, अपंग व्यक्तींसाठी ६५ टक्के गुण मिळवणं गरजेचं आहे. यापरीक्षेची अंतिम उत्तराची यादी ६ जुलै २०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती.
नॅशनल टेस्टिंग एजंसी (NTA) ने आज जेईई मेन परीक्षेचा निकाल (JEE Main Result 2022) जाहीर केला आहे. विद्यार्थी jeemain.nta.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन निकाल पाहू शकतात.
जेईई मेनचा निकाल कसा तपासाल?
: विद्यार्थ्यांना jeemain.nta.nic.in या अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहता येईल.
: वेबसाईटवरील होमपेजवर JEE Main Result 2022 या निकालासाठीच्या लिंकवर क्लिक करा.
: यानंतर विद्यार्थ्याने आयडी आणि पासवर्ढ प्रविष्ट करावा.
: यानंतर तुम्हाला तुमचा निकाल ऑनलाईन पाहता येईल.
: विद्याथी निकाल डाउनलोड करु शकतात.
: गरजेनुसार विद्यार्थी निकालाची प्रिंटही काढू शकतात.