मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीचा निकाल नुकताच जाहीर केला आहे. बारावीच्या परीक्षेत एकूण उत्तीर्णतेचा टक्का ९१.८८% आहे. मुलींचा निकाल ९४.५८% लागला असून मुलांचा निकाल ८९.५१% लागला आहे. बारावी परीक्षेला बसलेल्या विद्यार्थांना जर रि-चेकींगचा फॉर्म भरायचा असले तर त्या बाबतीतील अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत.
बोर्डाने पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार रि-चेकींगचा फॉर्म भरायची तारीख ६ मे २०२५ ते २० मे २०२५ पर्यंत असणार आहे. ज्यांना त्यांच्या मार्क्स बद्दल शंका असेल ते विद्यार्थी रि-चेकींगचा फॉर्म भरू शकता. जे विद्यार्थी निकालावर समाधानकारक नसल्यास त्यांच्या उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन आणि पुनर्तपासणीसाठी अर्ज करू शकतात. पुनर्मूल्यांकनासाठी शुल्क प्रति विषय ₹३०० आणि उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळविण्यासाठी प्रति विषय ₹४०० आहे.
उत्तराची फोटोकॉपी घेणे फॉर्म भरण्यासाठी गरजेचे आहे. अधिकृत सकेंतस्थळावर अर्ज भरता येणार आहे. ५० रुपये शुल्क प्रत्येक विषयासाठी आकारले जाणार आहे. रि-चेकींगचा फॉर्म भरायचा असेल तर उत्तर पत्रिकेची फोटो कॉपी घेणे अनिवार्य आहे. त्यासाठी विद्यार्थांना ६ मे ते २० मे या काळात अर्ज करावा लागेल.