-संतोष पवार
पळसदेव : राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये नवनिर्मितीची मानसिकता निर्माण करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेतर्फे (एससीईआरटी) हॅकेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार असून, प्रत्येक जिल्ह्याला एक हजार विद्यार्थी नोंदणीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. नोंदणीसाठी 25 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
एससीईआरटीचे संचालक राहुल रेखावार यांनी याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. स्टार्स प्रकल्पांतर्गत होणाऱ्या या हॅकेथॉनमध्ये 15 संकल्पनांतर्गत विद्यार्थ्यांनी स्थानिक ते जागतिक पातळीवरील समस्या सोडवण्यासाठीच्या प्रतिकृती करणे अपेक्षित आहे. या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेतील अधिव्याख्याता, वरिष्ठ अधिव्याख्याता समन्वयक अधिकारी म्हणून काम करणार आहेत.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेविषयी जागृती करण्यात येणार आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय अनुदानित, शासकीय शाळेतील सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार आहे.
हॅकेथॉनच्या आयोजनासाठी राज्यस्तरीय कार्यशाळा सप्टेंबरमध्ये घेण्यात आली. त्यानंतर हॅकेथॉनमध्ये सहभागाच्या नोंदणीसाठी आधी 15 नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर त्यास मुदतवाढ देण्यात आली