पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (SPPU) 2021-2022 या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करण्याचे परिपत्रक जारी केले आहे.
कोरोना काळात ज्यांनी आपले आई वडील किंवा पालक गमावले आहेत त्यांना याचा लाभ होणार असून या निर्णयाची सर्व महाविद्यालयांनी अंमलबजावणी करावी, असेही विद्यापीठाने म्हटले आहे. दरम्यान याबाबत यापूर्वी परिपत्रक जारी करण्यात आले होते, मात्र अनेक महाविद्यालयांनी अद्यापही या विद्यार्थ्यांचे शुल्क माफ केलेले नाही.
स्टुडंट्स हेल्पिंग हँड्स असोसिएशनने याबाबत तक्रार केली होती. तसेच 200 पात्र विद्यार्थ्यांची माहितीही सादर केली होती.
त्यानंतर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांनी याची दखल घेत परिपत्रक जारी केले. असे स्टुडंट हेल्पिंग हँड्स असोसिएशनने ही माहिती दिली.