लोणी काळभोर, (पुणे) : लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील सर्व जिल्हा परिषद शाळा व हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यामातून प्रयत्न केले जातील असे आश्वासन लोणी काळभोरच्या सरपंच माधुरी काळभोर यांनी केले.
लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील सर्व जिल्हा परिषद शाळांना लोखंडी कपाट व अंगणवाडी शाळांना वॉटर फिल्टरचे वाटप १५ व्या वित्त आयोग निधीतून सोमवारी (ता. १८) करण्यात आले. यावेळी काळभोर बोलत होत्या.
यावेळी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच राजाराम काळभोर, उपसरपंच संगीता काळभोर, माजी उपसरपंच राजेंद्र काळभोर, ग्रामपंचायत सदस्य नागेश काळभोर, सविता लांडगे, प्रियांका काळभोर, ललिता काळभोर, सागर काळभोर, स्नेहल कांबळे, संजय भालेराव, सर्व जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, अंगणवाडी सेविका व इतर मान्यवर उपस्थित होते.