-संतोष पवार
पळसदेव : पवित्र संकेतस्थळामार्फत निवड झालेल्या शिक्षकांना पुन्हा एक परीक्षा द्यावी लागण्याच्या चर्चेबाबत शिक्षण विभागाकडून खुलासा करण्यात आला आहे. पवित्र संकेतस्थळामार्फत राबवण्यात येत असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेतून नियुक्त झालेल्या शिक्षकांपैकी सेमी इंग्रजी माध्यमाच्या शिक्षकांसाठी कौशल्य चाचणीची तरतूद असून ती परीक्षा सरसकट सर्व अभियोग्यता धारकांना लागू नसल्याचे स्पष्टीकरण शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिले आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनातील 21 हजार 678 रिक्त पदातील एकूण 19 हजार 986 पदांसाठी पात्र उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. 2013 मध्ये निश्चित केलेल्या धोरणास अनुसरून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मागणीप्रमाणे सेमी इंग्रजी माध्यमाचे शिक्षक उपलब्ध करून देण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत. अशा शिक्षकांच्या नियुक्तीनंतर शिक्षण सेवक कालावधीमध्ये त्यांची कौशल्य चाचणी राज्य शैक्षणिक व संशोधन परिषदेच्या अधिनस्त विद्या प्राधिकरण छत्रपती संभाजीनगर या तज्ञ संस्थेकडून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या शाळांमध्येही इंग्रजी माध्यमातून चांगले शिक्षण मिळावे, त्यांच्या पालकांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांवर अवलंबून राहावे लागू नये, यादृष्टीने इंग्रजी विषयाची अधिक जाण असलेले शिक्षक या प्रक्रियेतून मिळण्याच्या हेतूने या कौशल्य चाचणीची तरतूद करण्यात आले आहे. त्यानुसार उमेदवारांनी त्यांचे प्राधान्यक्रम नोंदवले आहेत. सेमी इंग्रजी माध्यमाच्या रिक्त पदांसाठी उमेदवारांचे प्राधान्यक्रम लक्षात घेऊन शिफारस करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात 1288 उमेदवारांची सेमी इंग्रजी माध्यमासाठी शिफारस झाली आहे, अशी माहिती शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी दिली. कौशल्य चाचणी संबंधित उमेदवारांपुरतीच आहे पवित्र संकेतस्थळामार्फत निवड झालेल्या अन्य अभियोग्यता धारकांचा त्याच्याशी काहीही संबंध नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या शाळांमध्येही इंग्रजी माध्यमातून चांगले शिक्षण मिळावे , त्यांच्या पालकांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांवर अवलंबून राहावे लागू नये, यादृष्टीने इंग्रजी विषयाची अधिक जाण असलेले शिक्षक या प्रक्रियेतून मिळण्याच्या हेतूने या कौशल्य चाचणीची तरतूद करण्यात आले आहे. त्यानुसार उमेदवारांनी त्यांचे प्राधान्यक्रम नोंदवले आहेत. सेमी इंग्रजी माध्यमाच्या रिक्त पदांसाठी उमेदवारांचे प्राधान्यक्रम लक्षात घेऊन शिफारस करण्यात आली आहे.
पहिल्या टप्प्यात 1288 उमेदवारांची सेमी इंग्रजी माध्यमासाठी शिफारस झाली आहे, अशी माहिती शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी दिली. कौशल्य चाचणी संबंधित उमेदवारांपुरतीच आहे. पवित्र संकेतस्थळामार्फत निवड झालेल्या अन्य अभियोग्यता धारकांचा त्याच्याशी काहीही संबंध नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे .