पुणे : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष (सीईटी सेल) तर्फे तंत्रशिक्षण अंतर्गत पुढील वर्षी २०२५ मध्ये विविध पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी आयोजित प्रवेश परीक्षांचा अभ्यासक्रम संकेतस्थळावर प्रसिद्ध केला आहे. इंजिनिअरिंग फार्मसी, एमबीए, एमएसीए, हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग सर्व्हिसेस, बी. डिझाईन तसेच बी. बीबीए, बीसीए, बीएमएस, बीबीएम या अभ्यासक्रमासाठीच्या समावेश आहे.
परीक्षांचा बीई इंजिनिअरिंग तसेच बी. फार्मसी, बी. प्लॅनिंग आणि एमई, फार्म डी, तसेच एम. फार्म या अभ्यासक्रमांसाठी एमएचटी-सीईटी परीक्षा घेतली जाते. गणित, फिजिक्स आणि केमिस्ट्री आणि बायोलॉजी या विषयांचे शंभर गुणांचे तीन पेपर होणार आहेत. त्यासाठी प्रत्येकी १० मिनिटांचा कालावधी देण्यात आला आहे.
एमबीए आणि एमएमएस तसेच एमसीए अभ्यासक्रमांसाठी ऑनलाइन माध्यमातून २०० गुणांचा पेपर होणार आहे. बॅचलर आणि मास्टर्स इन हॉटेल मॅनेजमेंटसाठी १०० गुणांचा पेपर होईल. बॅचलर इन डिझाईनसाठी दोनशे गुणांचा पेपर होणार असून, त्यासाठी २ तास ४५ मिनिटांचा अवधी दिला आहे. बी. बीसीए, बीबीए, बीएमएस आणि बीबीएम या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी यावर्षीपासून प्रवेश परीक्षा घेण्यात आली पुढील वर्षीही १०० गुणांचा पेपर होणार असून, ९० मिनिटांचा कालावधी देण्यात आला आहे. माहितीसाठी विद्यार्थ्यांनी https://cetcell.mahacet.org या संकेतस्थळाला भेट द्यावी.