पुणे : वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज आहे. वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षण आता हिंदी भाषेतून मिळणार आहे. विद्यार्थ्यांसह पालकांकडून सरकारच्या या निर्णयाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
बरेच विद्यार्थ्यांची शिक्षण पात्रता असुनही केवळ इंग्रजी भाषेवर आवश्यक तेवढ प्रभुत्व नसल्याने त्यांना या शिक्षणापासून मुकावं लागतं. पण आता यावर मार्ग काढत हिंदी भाषिक विद्यार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे.
आता वैद्यकीय (Medical Education) आणि अभियांत्रिकी शिक्षण (Engineering Education) हिंदी भाषेतूनही घेता येणार आहे. देशातील मध्य प्रदेश हे पहिलं राज्य असणार आहे जिथे हिंदी भाषेतून वैद्यकीय शिक्षण दिल्या जाणार आहे. देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते भोपाळमध्ये (Bhopal) वैद्यकीय शिक्षणाच्या हिंदी अभ्यासक्रमाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. हिंदी अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकाचे अनावरण शाह यांच्या हस्ते होणार आहे.
पदवी (Graduation) तसेच पद्युत्तर (Post Graduation) वैद्यकीय (Medical) आणि अभियांत्रिकी (Engineering) शिक्षण (Education) संपूर्ण देशभरात फक्त इंग्रजी (English) भाषेतून दिल्या जातं. पण आता हिंदी (Hindi) भाषेतून हे शिक्षण घेण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांना आता ते सहज शक्य होणार आहे.