Beed News : बीड : शालेय पोषण आहार वाटपाची गुणवत्ता, शिजवण्यातील अडचणी यावरून अनेक कारणांनी गदारोळ झाल्याचे आपण वाचले असेलच. आता शिक्षिका आणि पोषण आहार शिजवण्याचे काम करणाऱ्या महिलेची फ्री स्टाइल हाणामारी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बीड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जोड हिंगणी शाळेत ही घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. यामागे शाळेतील अंतर्गत राजकारण असल्याचे कारण ग्रामस्थ सांगत आहेत. मात्र, खिचडी कोणाची शिजत आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.(Beed News)
घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दोघींनी शाळेच्या प्रांगणात अक्षरशः एकमेकींचे केस ओढत मारहाण केली. या वेळी खिचडी शिजवणाऱ्या महिलेने पतीसह शाळेत येऊन शिक्षिकेबरोबर झटापट केल्याचेही व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांना पुरेसे दर्जेदार अन्न देण्याची मागणी करणाऱ्या शिक्षिकेला पतीसह उपस्थित राहत पोषण आहार शिजवणाऱ्या महिलेने हुज्जत घातली. यामागे शाळेतील अंतर्गत राजकारण असल्याचे ग्रामस्थ म्हणत असल्याने नेमकी खिचडी कोणाची शिजत होती, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या प्रकाराची तालुक्यात जोरदार चर्चा आहे.(Beed News)
जोड हिंगणी येथे असणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पहिली ते चौथी वर्गामध्ये जवळपास ६० विद्यार्थी शिक्षण घेतात. या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना खिचडी शिजवणाऱ्या महिलेकडून निकृष्ट दर्जाचा आहार देणे, अल्प प्रमाणात खिचडी, बिस्किट देण्याचे प्रकार सातत्याने होतात. यामुळे शाळेतील एका शिक्षिकेने या महिलेस विद्यार्थ्यांना पोट भरून पोषण आहार देण्यास सांगितले. यावरून हा वाद पेटल्याची चर्चा आहे. या प्रकरणात अद्याप कुठलीही तक्रार करण्यात आलेली नाही. मात्र व्हिडिओ व्हायरल झाल्याने चर्चेला उधाण आले आहे.(Beed News)
याबाबत शाळेतील एका शिक्षिकेने महिलेस विद्यार्थ्यांना पोट भरून पुरेसा पोषण आहार देण्याची मागणी करत पोषण आहार शिजवणाऱ्या महिलेला मागील पंधरा दिवसांपूर्वी विनंती केली होती. तेव्हापासून खिचडी शिजवणाऱ्या महिला शिक्षिकेबाबत उलटसुलट चर्चा करत चुकीचे वक्तव्य करत असे, असा आरोप आहे. यातच खिचडी शिजवणाऱ्या महिलेचा पती शाळेच्या आवारात लघु शंका करत असल्याबाबतही महिलेने पतीला समज द्यावी असे सांगण्यात आले. परंतु सगळा गाव येथे येऊन तेच करतो मग माझ्या पतीने केल्यानंतर तुझं काय दुखतं… असं म्हणत शिक्षिकेवरच आकस दाखवला होता.(Beed News)
दरम्यान, या प्रकारास मुख्याध्यापकच जबाबदार असल्याचा गंभीर आरोप गावकऱ्यांनी केला आहे. खिचडी शिजवणाऱ्या महिलेने पुरेस अन्न विद्यार्थ्यांना देणे आणि यावर नियंत्रण ठेवणे हे मुख्याध्यापिकेचे काम असताना मुख्याध्यापिका सुद्धा खिचडीमध्ये हात ओले करून घेत असल्याची चर्चा गावातील नागरिकांमधून केली जात आहे.(Beed News)
हा वाद पूर्वनियोजित आहे का? असा संशय ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. या झालेल्या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामुळे धारुर तालुक्यात दिवसभर याचीच चर्चा सुरू आहे. शिक्षिकेने गटशिक्षणाधिकारी यांना लेखी निवेदन दिले असून त्यात दोघांपासून जीविताला धोका असल्याचे म्हटले आहे. मुख्याध्यापक यास कारणीभूत असल्याच्या चर्चेने नेमकी कोणाची खिचडी शिजत नव्हती असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.(Beed News)