उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन येथील महात्मा गांधी सर्वोदय संघाचे महात्मा गांधी विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल 98.06 टक्के लागल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य भारत भोसले यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज सोमवारी (ता. 27) दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला. महात्मा गांधी विद्यालयातील 465 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यातील 456 विद्यार्थी पास झाले आहेत.
प्रथम पाच आलेले विद्यार्थी..
प्रथम समीक्षा नितीन सोनवणे 96.40 टक्के,
व्दितीय स्मृती समीर पवार 95 टक्के,
तृतीय तनिष्का दत्तात्रय खेडेकर 94.40 टक्के
चतुर्थ उम्मेरुमान आरिफ शेख 93.40
पाचवा गायत्री सोमनाथ जगताप 92.40 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. एकूण उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी विशेष प्राविण्य 77 प्रथम श्रेणी 158 असे एकूण 235 विद्यार्थी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले
दरम्यान, वरील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे प्राचार्य, उपप्रमुख, सर्व पर्यवेक्षक व सर्व अध्यापक यांचे संस्थेचे उपाध्यक्ष के. डी.(बापू) कांचन, विश्वस्त सचिव सोपान कांचन, खजिनदार राजाराम कांचन तसेच सर्व विश्वस्त यांनी अभिनंदन केले. त्याचप्रमाणे प्राचार्य भारत भोसले उपप्रमुख जाधव सर व विभागप्रमुख कुंजीर आणि सर्व पर्यवेक्षक, अध्यापक-अध्यापिका, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.