नवी दिल्ली : सध्या गुगल पे, फोन पे आणि पेटीएम यांसारखे विविध ऑनलाईन प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. देशातील काही लोकांना Super Money App ची माहिती असेल. तर काही लोकांना नसेलही. पण, आता या प्लॅटफॉर्मचा वापर वाढल्याचे दिसून येत आहे. CRED App ला मागे टाकत Super Money App पुढे जाताना दिसत आहे. याला ग्राहकांकडून चांगला प्रतिसादही मिळत आहे.
Super Money App ने CRED ला मागे टाकले आहे. हे अॅप सहाव्या स्थानावर पोहोचले आहे. हा दावा ‘नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ म्हणजेच ‘एनपीसीआय’च्या डेटाच्या आधारे करण्यात आला आहे. मार्च महिना UPI साठी खूप चांगला महिना राहिला आहे. देयकाचा आकडा एक लाख कोटी रुपयांच्या पुढे जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. एक मार्च रोजी UPI वर 101628 कोटी रुपयांचे व्यवहार नोंदवले गेले. क्रेडिट कार्ड बिल पेमेंट अॅप क्रेड हे जवळपास एका वर्षापासून 130 दशलक्ष व्यवहारांसह बाजारपेठेतील टॉप-5 यूपीआय पेमेंट अॅप राहिले आहे.
Super Money आणि क्रेडिटचा बाजारातील वाटा खूपच कमी आहे. जर फोनपे, गुगल पे आणि पेटीएमशी याची तुलना केली तर क्रेड सुपर मनी आणि नावी यांचे व्यवहार खूपच कमी झाल्याचे दिसून आले. या तीन मीडियमचा UPI पेमेंटमध्ये महत्त्वपूर्ण वाटा आहे. जानेवारीमध्ये नावीचा बाजार हिस्सा 1.5 टक्के होता.