वाघोली : आम्हाला उग्रट का बोलला, तुला आता जिवंत सोडणार नाही” असे म्हणून संगमत करून दगड व हातातील कड्याने गंभीर दुखापत करून तरुणाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका आरोपीला गुन्हे शाखा युनिट 6 च्या पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना शुक्रवारी (ता. 16) रात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली होती.

रितेश अमृत कटके (वय 28, रा. विठ्ठलवाडी, वाघोली,असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर सुरज राजु जाधव (वय 21, धंदा – मजुरी रा. चौधरी बिल्डींग फ्लॅट नं 203 गुलमोहर सोसायटी समोर आय व्ही इस्टेट वाघोली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास जखमी इसम रितेश कटके हा डी मार्टचे समोर बकोरी फाटा वाघोली येथे मॅकडोनल्सचे पाठीमागे लघूशंकेसाठी जात असताना सूरज जाधव व त्याचे इतर तीन साथीदार यांनी “तू आम्हाला उग्रट का बोलला, तुला आता जिवंत सोडणार नाही” असे म्हणून दगड व हातातील कड्याने गंभीर दुखापत केली. याप्रकरणी जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.
सदर गुन्ह्याचे अनुषंगाने युनिट 6 कडील पोलीस अधिकारी व अंमलदार युनिट हद्दीत सदर आरोपींचा शोध घेत असताना अंमलदार ऋषीकेश ताकवणे यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, वर नमूद गुन्ह्यातील आरोपी सुरज राजु जाधव हा आयव्ही इस्टेस्ट वाघोली येथे थांबलेला आहे.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार त्यास सापळा रचून ताब्यात घेतले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे . त्याची वैदयकीय तपासणी करण्यात आली असून पुढील तपास कामी वाघोली पोलीस स्टेशन यांचे स्वाधीन करण्यात आले आहे .
सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक वाहीद पठाण, पोलीस उप निरीक्षक रामकृष्ण दळवी, रमेश मेमाणे, ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, गणेश डोंगरे, कीर्ती मांदळे यांचे पथकाने केलेली आहे.







