Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भोंदूबाबा अन् त्याच्या पोलीस पत्नीचा कारनामा! अलौकीक शक्तींच्या नावाखाली मैत्रिणीलाच फसवलं; अघोरी विधी केले, घरात आत्मा आहे सांगितलं अन्…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 15 April 2026, 20:08

जळगाव: जळगाव जिल्ह्यात अघोरी पूजा आणि करणीच्या नावाखाली मोठी फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ललित पाटील या भोंदूबाबाने आणि त्याची पत्नी महिमा पाटील हिने एका महिलेची तब्बल 11 ते 12 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी 2022 मध्ये गुन्हा दाखल झाला असला तरी दोन्ही आरोपी साडेतीन वर्षांपासून फरार आहेत.

पीडित महिला ही ग्राफिक डिझायनर असून तिची ओळख महिमा पाटीलसोबत कॉलेजपासून होती. घरगुती वादामुळे त्रस्त असलेल्या या महिलेने महिमाशी संपर्क साधला असता, तिने आपल्या पतीकडे अलौकिक शक्ती असल्याचे सांगून उपाय सुचवला. त्यानंतर ललित पाटील याने ‘अंगात पीर बाबा येतात’ असे भासवत अघोरी विधी सुरू केले आणि कुटुंबावर करणी झाली असल्याची भीती निर्माण केली.

 

सुरुवातीला लहान रक्कम घेऊन पूजा करण्यात आली. नंतर ‘गुप्त धन’ मिळवून देण्याचे आमिष दाखवत वेळोवेळी मोठ्या रकमा उकळण्यात आल्या. ही रक्कम रोख आणि ऑनलाईन पद्धतीने घेतली गेली. आरोपींनी पीडित महिलेला देशभर फिरवत उज्जैन, गोगामेडी, पुष्कर, अजमेर आणि ओंकारेश्वर येथे अघोरी पूजा केल्याचे सांगितले. तसेच भारत-पाक सीमेवरील तनोट माता मंदिर येथे विशेष पूजा केल्याचे सांगूनही पैसे उकळले.

जळगावात परतल्यानंतरही आरोपी दांपत्याने पुन्हा पुन्हा पैशांची मागणी केली. पैसे परत मागितल्यावर “मी अघोरी आहे, सात पिढ्यांचा नाश करेन” अशी धमकी देण्यात आल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे.

या प्रकरणाचा तपास जळगाव येथील रामानंद पोलिसांकडून सुरू आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी प्रयत्न केले असले तरी अद्याप त्यांना अटक करण्यात यश आलेले नाही. आरोपी महिला पोलीस कर्मचारी असल्यामुळे तपासात दिरंगाई होत असल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक करून आपले पैसे परत मिळावेत, अशी मागणी तिने पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यात मध्यरात्री थरार! संशयास्पद हालचाली; थरारक पाठलाग अन् झडती घेतल्यावर जे सापडलं ते पाहून पोलिसही चक्रावले

Sunday, 7 June 2026, 14:46

पुणेकरांची ‘ट्रॅफिक’मधून सुटका होणार! 500 ‘एआय’ कॅमेरे थेट करणार कारवाई; वाहतूक कोंडीवर हायटेक उपाय

Sunday, 7 June 2026, 14:18

पुण्यातील धक्कादायक प्रकार! 12 वर्षांच्या मुलीला ब्लॅकमेल; अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; केफेत नेलं अन् जबरदस्ती…

Sunday, 7 June 2026, 13:48

पुण्यात चाललंय काय? ‘ती’ एक मागणी अन् चार संसार उध्वस्त; अवघ्या 72 तासांत 4 विवाहितांची आत्महत्या

Sunday, 7 June 2026, 13:26

पुणेकरांनो पनीर खाताय? सावधान! पुण्यात 47 लाखांच्या भेसळयुक्त पनीर-खव्याचा साठा जप्त; एफडीएची मोठी कारवाई

Sunday, 7 June 2026, 12:59
Poster posted on social media; Big Daddy's sons invited to party, what really happened at 'that' high-profile party in Pune?

सोशल मीडियावर पोस्टर टाकलं; बड्या बापाच्या पोरांना पार्टीला बोलावलं, पुण्यातल्या ‘त्या’ हायप्रोफाईल पार्टीत नेमकं काय घडलं?

Sunday, 7 June 2026, 12:34
Next Post

पुण्यात सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्त्या! अंगावर पेट्रोल ओतून संपवलं जीवन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.