मुंबई: लोकसभा निवडणुकीपूर्वीचा शेवटचा अर्थसंकल्प संसदेत सादर झाला आणि त्याचा थेट उलटा परिणाम शेअर बाजारावर झाला. शेअर बाजार उघडल्यानंतर सेन्सेक्स-निफ्टीमध्ये चांगली वाढ दिसून आली, परंतू अर्थसंकल्पीय भाषण संपल्यानंतर बाजारात काहीशी घसरण झाल्याचे दिसून आले.
बँकेचे शेअर्स वाढले, रेल्वेचे शेअर घसरले
अर्थसंकल्पाच्या घोषणेनंतर, रेल्वेचे शेअर वाढतील असे सर्वांना वाटले, पम तसे झाले नाही. पीएसयू बँकांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे आणि बँक निफ्टीचे सर्व बँक पीएसयू शेअर्स हिरव्या रंगात बंद झाले आहेत.
सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी केवळ 10 समभाग वाढीसह बंद झाले आणि 20 समभाग तोट्यासह बंद झाले. त्याच वेळी, NSE निफ्टीच्या 50 पैकी 19 शेअर्स वाढीसह आणि 31 शेअर्स घसरणीसह बंद झाले.
बीएसईच्या मार्केट कॅपमध्ये फारसा बदल नाही
बीएसईच्या मार्केट कॅपमध्ये फारसा बदल झालेला नाही.तो 379.43 लाख कोटींवर आला आहे. आजच्या व्यापारात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत थोडीशी घट झाली आहे. बुधवारच्या बंदच्या वेळी बीएसईचे मार्केट कॅप जवळपास विक्रमी उच्चांकावर पोहोचले होते. शेअर बाजारातील तेजीमुळे बुधवारी गुंतवणूकदारांच्या संपत्तीत मोठी उसळी पाहायला मिळाली.
,