Mumbai News : मुंबई : शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सप्टेंबर महिन्यात विक्रमी डिमॅट खाती उघडण्यात आली आहेत. वार्षिक आधारावर सप्टेंबरमध्ये डिमॅट खात्यांची संख्या 26 टक्क्यांनी वाढून 12.97 कोटींवर पोहोचली आहे. डिमॅट खात्यांची संख्या वाढण्यामागे अनेक शेअर्सनी दिलेला चांगला परतावा हे कारण आहे.
शेअर बाजारात तेजी
एनएसडीएल आणि सीडीएसएलच्या आकडेवारीनुसार, सप्टेंबर महिन्यात 30.6 लाखांहून अधिक डिमॅट खाती उघडण्यात आली आहेत. तर ऑगस्टमध्ये हा आकडा 31 लाख रुपये होता. हा सलग दुसरा महिना आहे जेव्हा डिमॅट खाती उघडणाऱ्यांची संख्या 30 लाखांहून आहे. अधिक झाली आहे. गेल्या काही महिन्यांत शेअर बाजारात तेजी आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांच्या शेअर्सनी आकर्षक परतावा दिला आहे. यासोबतच सप्टेंबरमध्ये अनेक आयपीओ चांगल्या प्रीमियमवर लिस्ट झाले आहेत. यामुळे गुंतवणूकदार आकर्षित झाले आहेत.
कोविडनंतर वाढला कल
कोविडनंतर तरुणांचा शेअर बाजाराकडे कल झपाट्याने वाढला आहे. अशा परिस्थितीत दर महिन्याला डिमेंट खात्यांची संख्या वाढत आहे. सप्टेंबरमध्ये सेन्सेक्स 1.54 टक्के आणि निफ्टी 2 टक्क्यांनी वाढला आहे. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅपने अनुक्रमे 3.7 टक्के आणि 1.1 टक्क्यांनी झेप घेतली आहे.