नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत सराफा बाजारात बुधवारी सोन्याच्या दरात घसरण पाहिला मिळाली. जागतिक बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाल्यानंतर दिल्ली आणि परिसरात सोने 350 रुपयांनी स्वस्त होऊन 71,350 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले. गेल्या ट्रेडिंग सत्रात 99.9% शुद्धतेचे सोने 71,700 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते.
‘ऑल इंडिया बुलियन असोसिएशन’नुसार, चार दिवसांच्या घसरणीनंतर बुधवारी चांदीच्या दरात पुन्हा वाढ झाली. चांदीचा भाव 200 रुपयांनी मजबूत होऊन 82,200 रुपये प्रतिकिलो झाला. गेल्या सत्रात चांदी 82,000 रुपये प्रति किलोवर बंद झाली होती. सोने 350 रुपयांनी स्वस्त झाले, चांदी 200 रुपयांनी मजबूत झाली.
असे आहेत पुण्यातील सोन्याचे दर…
पुण्यात सध्या 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे दर 69,080 रुपये असून, मागील ट्रेडमध्ये ही किंमत मोठ्या फरकाने कमी झाली आहे. तर 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचे दर 63,940 रुपये झाला आहे. तर चांदीचे दर प्रतिकिलो 81,100 रुपयांवर गेले आहेत.