नवी दिल्ली : शेअर बाजारात सातत्याने चढउतार पाहिला मिळत आहे. त्यात गुरुवारी पुन्हा एकदा घसरण पाहायला मिळाली. त्यामुळे अनेक शेअर्समध्ये घसरण दिसून आली. असे काही शेअर्स आहेत ज्यांची किंमत 20 रुपयांपेक्षा कमी होती आणि ते गुंतवणूकदारांना नफा देणारी ठरली आहे. असाच एक शेअर आज अपर सर्किटला गेल्याचे दिसून आले.
VR Woodart Ltd असे या शेअरचे नाव आहे. त्याची किंमत 20 रुपयांपेक्षा कमी आहे. हा शेअर गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने गुंतवणूकदारांना चांगला परतावा देत आहे. गुरुवारी तो 2 टक्क्यांच्या वरच्या सर्किटला लागला. या वाढीसह तो 15.34 रुपयांवर पोहोचल्याचे पाहिला मिळाले. या शेअर्सने गेल्या एका महिन्यात प्रचंड नफा दिला आहे. या शेअर्सने 6 महिन्यांत 150% पेक्षा जास्त परतावा दिला आहे. या कालावधीत त्याचा परतावा दीडपट गेला. जर तुम्ही 6 महिन्यांपूर्वी त्यात 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज ती रक्कम 2.50 लाखांपेक्षा जास्त झाली असेल.
महिनाभरापूर्वी त्याची किंमत फक्त 7 रुपये होती. आता तो 15.34 रुपये आहे. अशा परिस्थितीत एका महिन्यात सुमारे 119 टक्के परतावा दिला आहे. हे दुपटीहून अधिक असल्याचे दिसून आले आहे. तुम्ही एका महिन्यापूर्वी गुंतवलेले 1 लाख रुपये आज 2 लाखांपेक्षा जास्त झाले असल्याचे पाहिला मिळू शकते.