नवी दिल्ली : जागतिक बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. अमेरिकन डॉलरच्या वाढीमुळे सोन्याचे भाव दोन टक्क्यांहून अधिक घसरले. या आठवड्यात सोन्याच्या दराने आतापर्यंतचा उच्चांक गाठला होता. यानंतर सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण पाहायला मिळत आहे.
सोन्याच्या दरात घसरणीचा परिणाम सोमवारी भारतीय बाजारात दिसून येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सोन्याच्या दरात घसरण झाल्यानंतर सप्टेंबरमध्ये होणाऱ्या फेडरल रिझर्व्ह बँकेच्या बैठकीत व्याजदर कपातीची अपेक्षाही वाढली आहे. सोने-चांदीच्या दरात घसरण हे लग्नसोहळ्यासाठी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी असणार आहे. येत्या काही दिवसांत सोन्याच्या दरात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे.
ताज्या ट्रेंडनुसार, स्पॉट गोल्ड 2.1% घसरून $2,404.90 प्रति औंस झाले. बुधवारी बुलियनने $2,483.60 चा सर्वकालीन उच्चांक गाठला. यूएस सोन्याचे फ्युचर्स सुमारे 2.2% घसरून $2,403.70 वर आले.
असे आहेत पुण्यातील सोन्याचे दर…
पुण्यात सध्या 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे दर 73,130 रुपये असून, मागील ट्रेडमध्ये ही किंमत थोड्याशा फरकाने कमी झाली आहे. 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचे दर 67,680 रुपये झाला आहे. तर चांदीचे दर प्रतिकिलो 90,410 रुपयांवर गेले आहेत.