नवी दिल्ली : दसरा, दिवाळी या सणानंतर आता सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याचे पाहिला मिळाली. ‘इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन’नुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,521 रुपयांनी घसरून 73739 रुपयांवर आला. यापूर्वी त्याची किंमत 75,260 रुपये प्रति दहा ग्रॅम होती.
चांदीच्या दरातही आज घसरण झाली. चांदीचा दर 2,644 रुपयांनी घसरून 87,103 रुपये प्रति किलो झाला. यापूर्वी चांदीचा भाव 89,747 रुपये होता. त्याच वेळी, 23 ऑक्टोबर रोजी चांदीने 99,151 रुपये आणि 30 ऑक्टोबर रोजी सोन्याने 79,681 रुपयांचा उच्चांक गाठला होता.
गेल्या 15 दिवसांत 24 कॅरेट सोने 5,942 रुपयांनी (7%) प्रति 10 ग्रॅम स्वस्त झाले आहे. 30 ऑक्टोबर रोजी 24 कॅरेट सोने 79,681 रुपये प्रति 10 ग्रॅम या विक्रमी पातळीवर होते, ते आता 73739 रुपयांवर आले आहे. तर चांदी 23 ऑक्टोबर रोजी 99,151 रुपयांवर पोहोचली होती, जी आता प्रति किलो 87,103 रुपये आहे.
असे आहेत पुण्यातील सोन्याचे दर…
पुण्यात सध्या 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे दर 74,360 रुपये असून, मागील ट्रेडमध्ये ही किंमत मोठ्या फरकाने कमी झाली आहे. तर 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचे दर 68,830 रुपये झाला आहे. तर चांदीचे दर प्रतिकिलो 90,000 रुपयांवर गेले आहेत.