आता ‘एटीएम’मधून पैसे काढणे महागणार आहे. 1 मे 2025 पासून नवे नियम लागू होणार आहेत. एटीएममधून मोफत पैसे काढण्याची मर्यादा संपल्यानंतर प्रत्येक वेळी पैसे काढताना जास्तीचं शुल्क द्यावं लागणार आहे. आता भारतीय रिझर्व्ह बँकेने एटीएम शुल्कात वाढ करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार शुल्क न घेता पैसे काढण्याची एक मर्यादा ठरलेली आहे. या मर्यादेनंतर एटीएममधून पैसे काढले तर प्रत्येक वेळी 21 ऐवजी 23 रुपये जास्त द्यावे लागणार आहेत.
व्यापारी बँका आणि थर्ड पार्टी एटीएम ऑपरेटर यांनी त्यांना एटीएम चालवण्याचा खर्च वाढल्याने तोटा होत आहे. त्यामुळे बऱ्याच काळापासून शुल्क वाढवण्याची मागणी लावून धरली होती. त्यानंतर नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ने आरबीआयला शुल्क वाढवण्याची शिफारस केली होती. ही शिफारस आरबीआय ने मंजूर केली आहे. त्यामुळे हा नवीन नियम 1 मे पासून लागू होणार आहे.
आतापर्यंत एटीएममधून पैसे काढण्याच्या मोफत मर्यादा संपल्यानंतर एटीएममधून पैसे काढण्यासाठी 21 रुपये शुल्क आकारले जात होते. मात्र आता 1 मे नंतर मोफत मर्यादेनंतर एटीएममधून पैसे काढले तर वापरकर्त्यांना प्रत्येक वेळी 2 रुपये जास्त द्यावे लागतील. म्हणजेच 1 मे पासून प्रत्येक अतिरिक्त व्यवहारांसाठी 23 रुपये द्यावे लागणार आहेत.