नवी दिल्ली : प्रसिद्ध कंपनी One97 कम्युनिकेशन्सने कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, अनेक कर्मचाऱ्यांना ‘नारळ’ दिला आहे. One97 कम्युनिकेशन्सच्या मालकीची पेटीएम कंपनी आहे. कंपनीने एका निवेदनात दावा केला आहे की, ते कर्मचाऱ्यांना त्यांच्या सुलभ हस्तांतरणासाठी ‘आउटप्लेसमेंट’ सहाय्य प्रदान करत आहे.
कंपनीकडून याबाबतचे निवेदन जरी जारी करण्यात आले असले तरी या निवेदनात किती कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आली, याची माहिती देण्यात आलेली नाही. Paytm चे हेडकाउंट (विक्री) जानेवारी-मार्च 2024 तिमाहीत 3500 ने घटून 36,521 वर आले आहे. मुख्यतः भारतीय रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट्स बँकेच्या सेवांवर बंदी घातल्यामुळे हा बदल दिसून आला आहे.
व्यापाऱ्यांसह ग्राहकांचे हित लक्षात घेऊन, भारतीय रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेड (PPBL) ला 15 मार्चपासून कोणत्याही ग्राहक खाते, वॉलेट आणि फास्टॅगवर ठेवी, क्रेडिट व्यवहार किंवा टॉप-अप स्वीकारण्यास प्रतिबंध केला होता. फिनटेक कंपनी One97 Communications चा तोटा आर्थिक वर्ष 2023-24 च्या चौथ्या तिमाहीत 550 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. त्यानुसार, ही कर्मचारी कपात करण्यात आल्याचे सांगण्यात आले.