Sunday, September 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Monsoon update : येत्या चार दिवसात जोरदार पावसाचा अंदाज; ‘या’ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 11 June 2024, 8:37

पुणे : मान्सून मुंबईमध्ये दाखल झाल्यापासून थोड्या अधिक प्रमाणात पावसाची रिमझिम सुरुच आहे. राज्यातही सगळीकडे पावसाने चांगलाच जोर धरल्याचं चित्र आहे. महाराष्ट्रात मान्सून पूर्णपणे व्यापायला अजून दोन दिवस लागणार असल्याचा अंदाज आहे. पुढील चार दिवस राज्यात पावसाची शक्यता कायम आहे. रायगड, पालघर, मुंबई, ठाणे या जिल्ह्यासह कोकणात पुढील 4 दिवस पावसाच्या सरी बरसतील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

‘या’ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

भारतीय हवामान विभागाकडून मुंबई, पालघर, ठाणे, रायगड या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच पुणे, कोल्हापूर, सातारा, अहमदनगर, सांगली या जिल्ह्यांनाही पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सोलापूर या जिल्ह्यांना आयएमडीने पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. याशिवाय राज्यभरात पुढील चार दिवस पावसाचा अंदाज कायम असणार आहे.

विजांसह वादळी पावसाची शक्यता

मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. मराठवाडा , उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज

विदर्भातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. चंद्रपूर, गडचिरोली, बुलढाणा, गोंदिय, नागपूर, वर्धा या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि ढगांच्या गर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आयएमडीने विदर्भातील काही जिल्ह्यांना पुढील चार दिवसांसाठी यलो अलर्ट दिला आहे. तसेच, नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहनही प्रशासनाने केलं आहे.

 

‘या’ जिल्ह्यात जोरदार पावसाच्या सरी

भारतीय हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तसेच काही भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय, पालघर, अहमदनगर, पुणे, सातारा, धाराशिव,लातूर, बीड या जिल्ह्यात जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

दहीहंडीच्या जल्लोषाला गालबोट! थर रचताना काळाचा घाला; 2 गोविंदांचा दुर्दैवी अंत, 300 हून अधिक जखमी

Sunday, 6 September 2026, 9:06

मैत्रिणीच्या त्रासाला कंटाळला अन् उचललं टोकाचं पाऊल; पुण्यात 26 वर्षीय तरुणाची हॉस्टेलमध्ये आत्महत्या, चिठ्ठीत धक्कादायक खुलासा!

Sunday, 6 September 2026, 8:43

मुंबईत मध्यरात्री अग्नितांडव! मोबाईल-प्लास्टिकच्या गोदामाला भीषण आग; धुराचे लोट अन् नागरिकांची धावपळ

Sunday, 6 September 2026, 8:27

IT विद्यार्थ्यानेच बनवलं बनावट अ‍ॅप! PMPMLला लावला चुना; चाणाक्ष कंडक्टरने 5 बनावट प्रवासी पकडले

Sunday, 6 September 2026, 8:11

अचानक अंगावर झडप घातली, कुत्र्यांनी चेहऱ्याचे लचके तोडले; जुन्नरमध्ये रस्त्यावर महिलेसोबत भयंकर प्रकार!

Sunday, 6 September 2026, 7:57

आभाळ पुन्हा भरून येणार! मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता कायम,; हवामान विभागाचा इशारा

Sunday, 6 September 2026, 7:41
Next Post

Paytm कडून पुन्हा कर्मचारी कपात; जाणून घ्या नेमकं कारण काय?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp