नवी दिल्ली : जॉन्सन अँड जॉन्सन कंपनी जवळपास सर्वांच्या परिचयाची आहे. आता या कंपनीबद्दल मोठी बातमी आली आहे, ज्यात J&J कंपनी एका व्यक्तीला 126 कोटी रुपये देणार असल्याचे सांगितले जात आहे. या व्यक्तीने 2021 मध्ये खटला दाखल केला होता. या बेबी पावडरवर गंभीर प्रश्न उपस्थित केला होता.
कनेक्टिकटमधील इव्हान प्लॉटकिन या व्यक्तीने J&J च्या बेबी पावडरवर आरोप लावला होता. त्यामध्ये त्याने अनेक दशकांपासून या टॅल्क पावडरचा वापर केल्यामुळे त्याला मेसोथेलियोमासारखा दुर्मिळ कर्करोग झाल्याचे म्हटले आहे. या व्यक्तीने 2021 मध्ये त्याच्या आजाराचे निदान झाल्यानंतर कंपनीविरुद्ध खटला दाखल केला होता. उपचारानंतर बरा झाल्यानंतर, इव्हान प्लॉटकिनने जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या विरोधात तक्रार दाखल केली.
फेअरफिल्ड काउंटी, कनेक्टिकट सुपीरियर कोर्टात दावा दाखल केला, की या बेबी पावडरच्या वापरामुळे त्याला गंभीर आजार झाला होता. ज्युरीने प्रकरण गांभीर्याने घेतले आणि असे आढळले की, जॉन्सन अँड जॉन्सनने नुकसान भरपाई द्यावी. त्यानुसार, आता कंपनीला 126 कोटी द्यावे लागणार असल्याचे सांगितले जात आहे.