कोल्हापूर : आजच्या आधुनिक जगात प्रत्येक तरुणाईच्या हातात स्मार्टफोन आपणाला पाहायला मिळत आहे. स्मार्टफोन बनविण्या मागचा हेतू होता की प्रत्येकाला आपली कामे वेगाने आणि वेळ न घालवता करता यावी. या उद्देशाने त्याची निंर्मिती करण्यात आली. परंतु या स्मार्टफोनचा वापर आजची तरुणाई योग्य कामासाठी न करता भलत्याच कामांसाठी उपयोग करीत आहे. मात्र, सध्या तरुणाई ऑनलाईन जुगार आणि गेम्सच्या विखळ्यात सापडली आहे. घानवडे (ता.करवीर) येथील एका तरुणाने पब्जी गेमच्या व्यसनातून विष प्राशन करून जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
हर्षद डकरे असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. हर्षद डकरे हा सतत पब्जी गेम खेळत होता. त्यामुळे त्याचे घरात वारंवारवाद होत असत. त्यातूनच हर्षदने टोकाचे पाऊल उचलून विष प्राशन केले.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच हर्षदला नातेवाईकांनी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. हर्षदचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पब्जी गेमच्या नादाने तरुणाला प्राण गमवावे लागल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.