Yerawada News | पुणे : किरकोळ कारणावरून कैद्यांच्या दोन गटात जोरदार हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना येरवडा मध्यवर्ती कारागृहात घडली. किशोर विभागातील बॅरक क्रमांक २च्या जवळील हौदाजवळ ही घटना शुक्रवारी (ता.३१ मार्च) सकाळी पावणेदहा वाजण्याच्या सुमारास घडली.
दोन न्यायालयीन कैदी गंभीर जखमी…
या हाणामारीत दोन न्यायालयीन कैदी गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. तर याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात ६ जणांवर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हरीराम गणेश पांचाळ आणि मुसा अबू शेख अशी जखमी झालेल्या न्यायालयीन कैदी असलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी कारागृह शिपाई एकनाथ गांधले यांनी सरकारच्या वतीने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार न्यायालयीन कैदी अर्जुन बाजीराव वाघमोडे, रोहन रामोजी शिंदे , साहील लक्ष्मण म्हेत्रे , ऋषिकेश हनुमंत गडकर , ओंकार नारायण गाडेकर , मंगेश शकील सय्यद यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदी येथे गेल्या वर्षी दोन गटात झालेल्या भांडणात आरोपी अर्जुन वाघमोडे, ओंकार गाडेकर व इतरांना अटक केली होती. त्यानंतर त्यांची न्यायालयीन कैदी म्हणून येरवडा कारागृहातील किशोर विभागात ठेवण्यात आले आहे. या विभागात इतरही न्यायालयीन कैदी आहेत. कारागृहातील हरीराम पांचाळ व मुसा अबू शेख यांच्याशी या आरोपीची भांडणे झाले होती.
दरम्यान, या भांडणाचा राग मनात धरुन अर्जुन वाघमोडे व इतरांनी तेथील प्लास्टिक बकेट, भाजी वाढण्याचे वरगाळे याच्या सहाय्याने दोघांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत पांचाळ व शेख हे गंभीर जखमी झाली.
या घटनेची माहिती कारागृह शिपायांना समजल्यानंतर शिपाई तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पांचाळ व शेख यांना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास येरवडा पोलीस करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Pune Crime | पुण्यात पत्नीचा राग अनावर ; पतीच्या पोटात खुपसला चाकू; हे; आहे कारण