Monday, July 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor Crime | लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या नागरीकांनो सावधान ; चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच, चोरीच्या घटना अद्याप अनडिटेक्टच..!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 2 April 2023, 16:41

Loni Kalbhor Crime |  लोणी काळभोर, (पुणे) : लोणी काळभोर, उरुळी कांचन, कोरेगाव मुळसह परिसरात मागील काही दिवसांपासून चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या नागरीकांनो सावधान, आपल्या वस्तूंची काळजी घ्या. अशी चर्चा या भागात रंगली आहे.

लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मगील पंधरा दिवसात घरफोडी, दोन चारचाकी व दुचाकी चोरून नेल्याच्या तक्रारी लोणी काळभोर पोलिसांकडे आल्या आहेत. यामध्ये एका कोरेगाव मूळ व उरुळी कांचन येथील चोरीचाही समावेश आहे.

बीट मार्शलचे मोठ्या थाटामाटात उद्घाटन,पण….

दरम्यान लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तसेच उरुळी कांचन पोलीस दूरक्षेत्र परिसरात तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते बीट मार्शलचे मोठ्या थाटामाटात उद्घाटन करण्यात आले होते. यामुळे चोऱ्या व घरफोड्या कमी होतील हा पोलिसांचा दावाही, मागील काही दिवसांतील चोऱ्यांमुळे फोल ठरला आहे.

 

लोणी काळभोर पोलिसांच्या हद्दीत मागील एक वर्षापूर्वी उरुळी कांचन येथे अज्ञात दरोडेखोरांनी एका महिलेला मारहाण करून सोन्याचे दागिने लुटून नेले होते. याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र अद्यापही त्याचा तपास लागू शकला नाही. उरुळी कांचन येथील दातार कॉलनी परिसरात महिला दिनाच्या दिवशीच अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश किमती ऐवज व रोख रक्कम चोरून नेली होती.

उरुळी कांचन व कोरेगाव परिसरातून एकच दिवशी दोन चारचाकी गाड्या चोरून नेल्या होत्या. मात्र त्यातील एक चारचाकी गाडी वाटेतच बंद पडल्याने मिळून आली तर दुसऱ्या गाडीचा अद्यापही शोध लागू शकला नाही. सोमवारी (ता. २७ मार्चला) हि घटना घडली आहे. याबाबतची तक्रार दाखल होऊनही, चोरटे हाती लागू शकलेले नाहीत. कोरेगाव मूळ परिसरातही घटना घडल्या आहेत. मात्र पोलिस अद्याप चोरट्यांपर्यंत पोहचू शकलेले नाहीत.

अनेक घरफोड्या व वाहने, चोरीच्या घटना अद्याप अनडिटेक्टच..!

लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक दुचाकी व चारचाकी गाडी चोरीला गेल्या आहेत. तसेच पुणे – सोलापूर महामार्गावर मोठमोठे अपघात झाले आहेत. या अपघातात अनेकांना आपल्या जीवाशी मुकावे लागले आहे. या अपघातात अज्ञात वाहने धडक देऊन निघून गेली मात्र त्या वाहनांचा व चालकांचा आजूनही थांगपत्ता मिळू शकला नाही. तसेच अनेक घरफोड्या व वाहने चोरीच्या घटना अद्याप अनडिटेक्टच आहेत.

नेटवर्क संपले ; डीबी कुठंय?

लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे सध्या खबऱ्यांचे नेटवर्क संपले आहे. मागील सहा ते सात महिन्यात कोणत्याही घटनेचा तपास डीबी पथक करू शकले नाही.त्यामुळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिस ठाण्याची गुन्हे प्रकटीकरण शाखा काय करते? ती योग्य काम करत नसेल, तर ती हवी कशाला असा दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. एखादा गुन्हा घडला तर त्या ठिकाणची सर्व माहिती घेऊन तत्काळ त्या आरोपीपर्यत पोहोचण्याचे काम डीबीचे आहे.

मात्र लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील डीबी पथकाची कामगिरी काहीच नाही. तगडी पोलिस यंत्रणा असतानाही लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. अशा वाढत्या घटनांमुळे लोणी काळभोर, उरुळी कांचनसह परिसरातील नागरिक हवालदिल झाले असून पोलीस ठाण्याबाबत नागरिकांमध्ये नाराजीचा सूर पसरला आहे.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…

Loni Kalbhor Crime : लोणी काळभोर, उरुळी कांचनसह परिसरात गुटखा विक्री जोमात ; पोलीस प्रशासनाचे हाताची घडी अन् तोंडावर बोट..!

Loni Kalbhor : स्थानिक गुन्हे शाखेच्या ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कामगिरी, दुचाकी चोरणाऱ्या आंतरजिल्ह्यातील दोघांना बेड्या, अडीच लाखांच्या ८ मोटारसायकली जप्त..!

Loni Kalbhor News | पुणे  सोलापूर राष्ट्रीय महामार्ग हा अवैध धंद्याचे केंद्र ; तरुणाई व्यसनाच्या आहारी, लोणी काळभोर पोलिसांकडून मागील तीन महिन्यात कोणतीही मोठी कारवाई नाही..!

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी मोठी बातमी! ६ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले घराबाहेर न पडण्याचे निर्देश

Sunday, 5 July 2026, 23:07

वारीच्या काळात पुणेकरांना दिलासा! ८ ते १० जुलै दरम्यानची पाणी कपात रद्द; पालखी सोहळ्यासाठी महापालिकेचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 22:55

३ कोटींची भेसळ, १३ जण अटकेत! तुकाराम मुंढे आणि पुणे पोलिसांची संयुक्त मोठी कारवाई

Sunday, 5 July 2026, 21:55

पत्रकार अमोल वैद्य यांच्याकडे ज्ञानवर्धिनी बालक मंदिरचे नेतृत्व; मॉडर्न हायस्कूल चेअरमनपदी प्रतिमा कुलकर्णी तर प्रशासकीय अधिकारीपदी संतोष कचरे यांची निवड

Sunday, 5 July 2026, 21:16

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

Sunday, 5 July 2026, 20:34

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38
Next Post

BJP News |बारामतीत भाजप राष्ट्रवादीला देणार आव्हान ; बाजार समितीची निवडणूक लढणार असल्याचे केले जाहीर...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.