राहुलकुमार अवचट
Yavat News : यवत, (पुणे) : बँकेत भरणा करण्यासाठी गेलेल्या महिलांचे पैसे चोरून दुचाकीवरून पळून गेलेल्या चोरट्याच्या दुचाकीचा अपघात होऊन चोरटा गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. पारगाव सालू मालू येथून चोरट्याने पोबारा केला होता. तसेच या अपघातात आणखी एक दुचाकीस्वार जखमी झाला आहे.
जखमी चोरटा सराईत गुन्हेगार
इब्राईम बाबु इराणी (वय-५४ रा. शिवाजीनगर, पुणे) असे जखमी झालेल्या चोरट्याचे नाव आहे. (Yavat News) तर सखाराम पिरतु हंडाळ (वय ४० रा. हंडाळवाडी, केडगाव, ता. दौंड) असे अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
यवत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पारगाव सालू मालू येथे बुधवारी (ता. ०४) सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास पारगाव युको बँक शाखेत मीना ढोरजकर, त्यांच्या भावजय सविता ताकवणे व भाचा वैभव ताकवणे हे भरणा करण्यासाठी गेले असता एका अनोळखी व्यक्तीने त्यांच्या हातातील साडे बारा हजार रुपयांची रोख रक्कम हातातून हिसकावुन मोटर सायकल वरून पळून गेला होता. (Yavat News) याबाबत मिना राजेंद्र ढोरजकर यांनी यवत पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली होती.
पारगाव येथे युको बँकेत भरणा करण्यासाठी गेलेल्या महिलांचे पैसे चोरून पळणारा आरोपी इब्राईम इराणी हा दुचाकीवरून पळून जाताना त्याचा यवत गावच्या हद्दीतील जगताप फॉर्मजवळ दुचाकीला धडकून अपघात झाला. या अपघातात सखाराम हंडाळ हे जखमी झाले. (Yavat News) याबाबत उमेश गायकवाड यांनी यवत पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली.
दरम्यान, आरोपी इब्राईम इराणी याचेवर शिरूर, पिंपरी, शिवाजीनगर, खडक पोलीस स्टेशन येथे विविध गुन्हे दाखल असून याबाबत पुढील तपास यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश बावकर व पोलिस हवालदार दौंडकर हे करीत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Yavat News