Yavat News : यवत, (पुणे) : दौंड तालुक्यातील सहजपूर फाटा परिसरातील ‘स्वराज फर्टिलायझर’ या खत-औषधांच्या दुकानात अज्ञात चोरांनी धाडसी घरफोडी केली आहे. दुकानाचा लोखंडी पत्रा कशाच्या तरी साहाय्याने उचकटून चोरांनी आत प्रवेश केला आणि दुकानातील तब्बल 1 लाख 5 हजार रुपयांची रोकड, रासायनिक-जैविक औषधे आणि सीसीटीव्हीचा डीव्हीआर असा एकूण 2 लाख 7 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. Yavat News

बुधवारी (ता. 27) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास दुकान बंद झाल्यानंतर ते गुरुवार, दिनांक 28 मे 2026 रोजी सकाळी दुकान उघडेपर्यंतच्या कालावधीत ही चोरीची घटना घडली. याबाबत संदीप सोपान चोरघे (वय-34, व्यवसाय- दुकान, रा. आळंदी म्हातोबाची, ता. हवेली) यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. Yavat News
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संदीप चोरघे यांचे सहजपूर फाटा (ता. दौंड) गावच्या हद्दीत ‘स्वराज फर्टिलायझर’ नावाचे शेतीचे दुकान आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन अज्ञात चोरांनी दुकानाच्या मागील किंवा बाजूचा लोखंडी पत्रा कशानेतरी उचकटला. त्या वाटेने चोरांनी दुकानात अनाधिकाराने प्रवेश केला आणि गल्ल्यातील रोकड व औषध साठ्यावर हात साफ केला. Yavat News
यावेळी चोरांनी ओळख पटू नये आणि पोलिसांना कोणताही सुगावा लागू नये म्हणून दुकानात लावलेल्या ‘हिकव्हिजन’ कंपनीचा सीटीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर देखील उचकटून सोबत नेला. यामध्ये 1 लाख 5 हजार रुपयांची रोख रक्कम, 1 लाख रुपयांची महागडी रासायनिक तसेच जैविक औषधे व 2 हजार रुपये किमतीचा डीव्हीआर असा 2 लाख 7 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेह्ल्याचे दुकान उघडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी संदीप चोरघे यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. Yavat News







