सातारा : गेल्या काही दिवसांपासून अत्याचाराच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशातच आता मेहंदी काढण्याच्या बहाण्याने एका विवाहित महिलेवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना साताऱ्यात घडली आहे. ही घटना बुधवारी(7)रात्री सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास घडली.या घटनेने साताऱ्यात संतापाची लाट उसळली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गुन्ह्यातील पीडिता आपल्या पतीसह भाड्याने राहण्यास आहे. या पीडितेचा पती एका हॉटेलवर काम करतो. पीडिता रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घरात एकटीच असताना नराधम आरोपी मेहंदी काढण्याच्या बहाण्याने घरात शिरला.
थोडा परिचित असणारा शंकर बदू जाधव या व्यक्तीने पीडीतेलातुम्ही मेहंदी काढता का? तुम्ही मेहंदीची ऑर्डर घेता का? मेहंदीचे क्लास घेता का? असे प्रश्न विचारले. त्यावेळी पीडित महिलेने मेहंदीचे ऑर्डर घेते; परंतु मेहंदीचे क्लास घेत नाही, असे सांगितले. त्यावेळी माझ्या ओळखीचा एकीला क्लास लावायचा आहे,त्याची किती फी घेणार असं त्याने खोटं सांगितले. त्यावेळी त्याला महिलेने मोबाईलमधील मेहंदीचे फोटो दाखवले. त्यावेळी त्याने ती महिला घरात एकटी असल्याचा फायदा घेत तिला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला.
या घटनेची नोंद पीडित विवाहितेने मसूर पोलिसात दिली असून शंकर बंदु जाधव असं गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.