Wagholi News : वाघोली, (पुणे) : लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतिल रायसोनी कॉलेज परिसर वाघोली भागात वाघोली वाहतूक पोलीस व युनिट ६ चे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी मिळून विना वाहन परवाना, ट्रिपल सीट, बुलेट सायलेन्सर, मोबाईल टॉकिंग असे एकूण १६ गुन्हे दाखल केले आहेत. (Wagholi News)
गुन्हे शाखा युनिट ६ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रजनीश निर्मलयांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रायसोनी कॉलेज परिसर वाघोली भागात विना वाहन परवाना, ट्रिपल सीट, बुलेट सायलेन्सर, मोबाईल टॉकिंग बाबत नागरिकांनी पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या.
त्या तक्रारींच्या अनुशंघाने वाघोली वाहतूक पोलीस व युनिट ६ पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी मिळून विना वाहन परवाना, ट्रिपल सीट, बुलेट सायलेन्सर, मोबाईल टॉकिंग असे एकूण १६ गुन्हे दाखल केले आहेत. (Wagholi News)
दरम्यान, रायसोनी कॉलेज परिसरात ३ बुलेट चालकांवर (मोठ्याने आवाज काढणे) यांवर ट्रॅफिक नियमन कायद्याप्रमाणे कार्यवाही केलेली आहे. तसेच कॉलेज व शाळा प्रशासन यांना काही अनुचित प्रकार घडत असल्यास संपर्क साधण्याबद्दल आवाहन करण्यात येत आहे.
याबाबत बोलताना गुन्हे शाखा युनिट-६ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल म्हणाले, “लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व शाळा व कॉलेज परिसरात रोड साईट रोमिओ, विनाकारण येणारे मुले, एडमिशनच्या नावाखाली महागड्या गाड्या घेऊन येऊन कॉलेज परिसरात फिरवणे अश्या प्रकारे कृत्य करणारे मुले यांचा कॉलेज प्रशासन टीम सोबत शोध घेतला जाणार असून त्यांचेवर यापुढे गुन्हे शाखा युनिट-६, लोणीकंद पोलीस व वाहतूक विभाग असे संयुक्तरित्या प्रचलित कायद्याद्वारे कठोर कायदेशीर कारवाई करणार आहे.”