Wagholi News : वाघोली भरदिवसा घराची कडीकोयंडा उचकटून 13 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे समोर आले होते. याप्रकरणी लोणीकंद पोलिसात अज्ञातांविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. लोणीकंद पोलिसांनी आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून सात लाखांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.(Wagholi News)
13 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरी.
चंद्रकांत उर्फ (चंद्या) अनंत माने (वय 32 रा. पिंपरी) आणि त्याचा साथीदार प्रमोद उर्फ पप्पू विलास पाटोळे (वय २५, रा.काळेवाडी पिंपरी) या दोघांना पोलिसांनी अटक केली. चंद्रकांत हा तुरुंगातून नुकताच सुटला होता. आरोपींकडून चोरीस गेलेला १३ तोळे सोन्याचा लगड असा ७ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. या आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.(Wagholi News)
दरम्यान, या गुन्ह्याच्या तपासासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांनी तत्काळ तपासी पथक अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक गोडसे, जाधव यांच्या नेतृत्वाखाली दोन पथके तयार करून गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार, गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन दोन्ही तपास पथके शुक्रापूर व दौंड भागात आरोपीच्या शोधात होते. अखेर पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली.(Wagholi News)