सुरेश घाडगे
परंडा : शहरातील मुख्य मंडई पेठेतील वर्धमान ज्वेलर्स येथील चार वर्षापुर्वीच्या धाडसी दरोडा प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्याचे आदेश औरंगाबाद व येथील उच्च न्यायालय खंडपीठाने दिले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील दुसरा तर परंडा शहरातील पहिला तपास सीआयडीकडे जाण्याची ही घटना आहे.
परंडा येथील दरोड्याच्या घटनेला ३ वर्ष १० महिने १० दिवस झाले आहेत . तपास लागत नसल्याने वर्धमान ज्वलर्सचे मयुर बेदमुथा यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंडा पोलीस तसेच स्थानिक गुन्हे शाखा उस्मानाबाद येथील तपासीक अधिकारी यांच्याकडून चोरीस गेलेला माल जप्त करणे व तपास करण्यास सक्षम नसल्या कारणाने औरंगाबाद उच्च न्यायालय खंडपीठ यांनी तपास यंत्रना बदलण्यासाठी निर्देश दि .१ मार्च २०२२ रोजी दिले.
त्यानंतर औरंगाबाद उच्च न्यायालय खंडपीठाने फो.प्र सहित कलम १७८(८)नुसार अधिकाराचा वापर करण्याचा आदेश परंडा न्यायालयास दिले आहेत . त्यामुळे बुधवार ( दि .१९ ) या गुन्ह्याचा तपास सीआयडी मार्फत व्हावा व मुद्देमाल हस्तगत करावा असे आदेश परंडा न्यायालयाने दिले आहेत
दरम्यान, वर्धमान ज्वेलर्स येथील ९ जानेवारी २०१९ रोजी पहाटे धाडसी दरोडयाची घटना घडली होती. परंडा पोलीस तसेच स्थानिक गुन्हे शाखा उस्मानाबाद येथील तपासीक अधिकारी यांना चोरीस गेलेला माल जप्त करणे व तपास करण्यास पावनेचार वर्ष झाले तरी तपास नाही .या धाडसी दरोड्यामध्ये सोने -चांदी असा एकूण ३० लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीस गेला होता.
याबाबत बोलताना मयुर मनोजकुमार बेदमुथा यांनी सांगितले कि, या दरोड्याबाबत पोलिसांना वेळोवेळी विनंती करूनही कोणताही मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला गेला नाही . त्यामुळे उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे याचिका दाखल करून उच्च न्यायालयाने वेळोवेळी पोलिसांना खडसावून सुधा आरोपी अटक करुनही जाणुन बुझून तपास केला नाही. न्यायालयाने याआधी सदर प्रकरणात ताशोरे ओढून देखील तपास लागला नाही . या घटनेपासून माझे कुटूंब आर्थिक व मानसिक संकटात आहे . कर्जबाजारी आहे .सीआयडी यंत्रनाकडून तरी न्याय मिळेल, अशी आशा बेदमुथा यांना व्यक्त केली आहे .