Thursday, July 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Uruli Kanchan : भाडेकरूची माहिती लपवल्याप्रकरणी उरुळी कांचन पोलिसांकडून घरमालकावर गुन्हा दाखल ; कोरेगाव मूळ येथे दहशतवाद विरोधी शाखेची कारवाई

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Thursday, 14 May 2026, 11:46
Theft of farmers' electric cars and cables in Valti; Farmers suffer huge losses, Uruli Kanchan police demand action against thieves

Uruli Kanchan : उरुळी कांचन, (पुणे) : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करून भाडेकरूची माहिती पोलीस ठाण्यात न देणाऱ्या घरमालकावर उरुळी कांचन पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली आहे. कोरेगाव मूळ येथील ‘गोल्डन नेस्ट सोसायटी’मधील एका फ्लॅट मालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २२३ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. Uruli Kanchan

ही कारवाई कोरेगाव मूळ, (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील गट नं. 203, गोल्डन नेस्ट सोसायटी, प्लॅट नं. 19 येथे बुधवारी (ता. 13) दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास कोरेगाव मूळ, गट नं. 203, गोल्डन नेस्ट सोसायटी, प्लॅट नं. 19,येथे करण्यात आली. नवनाथ काळूराम दिवेकर (रा. वरवंड ता. दौंड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत पोलीस हवालदार निलेश बाळासाहेब कदम, (नेमणूक दहशतवाद विरोधी शाखा, पुणे ग्रामीण) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. Uruli Kanchan

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी शाखेचे (ATS) सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे हद्दीत परप्रांतीय आणि संशयीत व्यक्तींच्या शोध मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेदरम्यान ज्या घरमालकांनी आपल्या भाडेकरूंची माहिती विहित नमुन्यात पोलीस ठाण्याला कळवली नाही, त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. Uruli Kanchan

 

दहशतवाद विरोधी शाखेचे पथक कोरेगाव मूळ परिसरात तपासणी करत असताना, त्यांना माहिती मिळाली की नवनाथ दिवेकर यांनी त्यांच्या कोरेगाव मूळ येथील ‘गोल्डन नेस्ट सोसायटी’मधील प्लॅट नं. १९ (गट नं. २०३) मध्ये ऋषिकेश सुरेश पवार या तरुणाला भाडेकरू म्हणून ठेवले आहे. पोलिसांनी घरमालकाकडे भाडेकरूच्या माहितीचे रेकॉर्ड मागितले असता, त्यांनी कोणतीही माहिती पोलीस ठाण्यास दिली नसल्याचे कबूल केले. Uruli Kanchan

पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी 20 मार्च 2026 रोजी निर्गमित केलेल्या आदेशानुसार, सर्व घरमालकांनी आपल्या भाडेकरूंची सविस्तर माहिती स्थानिक पोलीस स्टेशनला देणे बंधनकारक आहे. भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अन्वये हे आदेश लागू करण्यात आले आहेत. या आदेशाचे जाणीवपूर्वक उल्लंघन केल्याप्रकरणी पोलीस हवालदार निलेश कदम यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार नवनाथ दिवेकर यांचे विरुध्द बी. एन. एस. कलम 223 प्रमाणे कायदेषीर कारवाई करण्यात आली आहे. Uruli Kanchan

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07

पुणे पोलिसांचा ‘सिंघम’ अवतार! गुंडाच्या हॉटेलवर चालवला बुलडोझर; आर्थिक रसद तोडल्याने गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले

Thursday, 2 July 2026, 20:30

‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ चित्रपटावर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया; म्हणाल्या “पात्र साकारण्यासाठी माझी परवानगी…”

Thursday, 2 July 2026, 19:47

पुण्यात केअरटेकरचा कारनामा! वृद्ध आईची जबाबदारी सोपवली; विश्वास ठेवला अन् तिनंच घात केला

Thursday, 2 July 2026, 18:54
Next Post

Raviraj Sable-Patil : सोशल मीडियावर 'ओंकार उद्योग समूहा'ची बदनामी ; इंदापुरात रवीराज साबळे-पाटलांवर गुन्हा दाखल, खोटी माहिती पसरवून शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण केल्याचा ठपका..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.