अजित जगताप
सातारा : चुकीच्या पद्धतीने एका महिलेची प्रसूती केल्याप्रकरणी तब्बल सव्वा महिन्यानंतर बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी डॉक्टर पती-पत्नीसह दोन कर्मचाऱ्यांना बोरगांव पोलिसांनी अटक केली आहे. य सातारा जिल्ह्यातील वैद्यकीय व्यवसायातील काळी बाजू महिला दिनीच उघड झाली आहे.
या प्रकरणी डॉ. विकास घाडगे, डॉ. सौ. मेघा घाडगे,कोमल गायकवाड व निलेश घाडगे यांना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलम सॊमनाथ बेंद्रे यांना पहिली मुलगी असून दुसऱ्यांदा गरोदर राहिल्यानंतर नागठाणे ता. सातारा येथील घाडगे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होत्या.
त्यांची पहिली प्रसूती ही याच हॉस्पिटलमध्ये साधारण झाली होती. दुसऱ्या प्रसूतीसाठी डॉ. घाडगे यांनी ९ फेब्रुवारी २०२३ ही तारीख दिली होती. त्यावेळी सातवा महिना चालू होता. डॉ. घाडगे हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफी केली होती. त्यावेळी निलम बेंद्रे यांच्या पोटातील मुल उलट स्थितीत होते. त्यामुळे शस्त्रक्रिया करावी लागेल, असे डॉक्टरांनी सांगितले होते.
१ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ९.३० वाजता निलम मांडीमधून तसेच छातीमधुन कळ येऊ लागल्याने बेंद्रे पती-पत्नी दोघेजण घाडगे हॉस्पिटलमध्ये गेले. मात्र मुख्य डॉ. विकास घाडगे हॉस्पिटमध्ये नव्हते. मात्र तिथे असलेले निलेश घाडगे नावाची व्यक्ती ही डॉक्टर असून ते उपचार करतील असे सिस्टर कोमल यांनी सांगीतले. निलेश घाडगे यांनी इन्जेक्शन दिले. त्यानंतर बेंद्रे यांना जास्तच कळा येवु लागल्याने मुल बाहेर आले. मुल पालत्या स्थितीत बाहेर आल्याचे असे सांगितले.
या प्रकारानंतर डॉ. विकास घाडगे हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. त्यांनी मूल मृत झाल्याचे सांगितले. यामुळे बेंद्रे यांना धक्का बसला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच नवजातबालकाचा मृत्यू झाल्याने हे प्रकरण मिटवण्यासाठी पैसे देण्याची आमिष दाखवले. ५ फेब्रुवारी रोजी बोरगांव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आरोपींना कोठडीत ठेवण्यात आले आहे.
या प्रकरणी डॉ. विकास घाडगे, डॉ. सौ. मेघा घाडगे,कोमल गायकवाड व निलेश घाडगे यांना पोलिसांनी अटक केली आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक रविंद्र तेलतुंबडे करीत आहेत. दरम्यान, सदरच्या घटनेबाबत सातत्याने पाठपुरावा करून आरोपींना अटक व्हावी, यासाठी सामाजिक कार्यकर्ते सॊमनाथ पवार यांनी पाठपुरावा केला. त्यामुळे डॉक्टर पती-पत्नी व त्यांना मदत करणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे.