पुणे : एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घराचे प्लास्टर सुरु असताना भिंत कोसळून शेजारी राहणाऱ्या दोन व्यक्तींचा जागेवरच मृत्यू झाला आहे. तर एकजण किरकोळ जखमी झाल्याची घटना मोशी येथील तापकीर नगर परिसरात घडली आहे.
उत्तम नारायण मोरे रा. साई कॉलनी, तापकीर नगर मोशी) व मेहबूब (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) असे मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. तर जखमी झालेल्याचे नाव समजू शकले नाही.
मिळालेल्या महितीनुसार, मोशी येथील तापकीर नगर परिसरात तात्याराव बाबुराव जाधव यांच्या घराचे प्लास्टर चे काम चालू होते. काम सुरु असताना अचानक घराची भिंत हि बाजूला असलेल्या पत्राच्या खोलीवर पडली. यामध्ये खोलीत बसलेल्या दोघांचा जागेवरच मृत्यू झाला असून किरकोळ गंभीर जखमी झाला आहे.
दरम्यान, सदर ठिकाणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याचे पोलीस पोहचले असून पुढील कारवाई सुरु असल्याची माहिती एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांनी दिली आहे.