Daund Crime : दौंड, (पुणे) : कानगाव (ता. दौंड) Kangaon) ग्रामपंचायत हद्दीतील अज्ञात चोरट्यांनी (Unknown thieves) दोन ठिकाणी घरफोड्या करून सुमारे ८ लाख ९ हजार ७७८ रुपयांचा ऐवज लंपास केला. गुरुवारी (ता. २०) (Thursday)सकाळी ही घटना उघडकीस आली आहे. यामुळे परिसरात भीतीचे (spread) वातावरण पसरले असून एकच खळबळ (excitement) उडाली आहे.
राजेंद्र दशरथ गवळी व विनोद दत्तात्रय फडके अशी घरात चोरी झालेल्या घरमालकांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्र दशरथ गवळी यांच्या राहत्या घरातील बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. यावेळी लोखंडी कपाटातील तीन लाख रुपये रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने, असा एकूण ७ लाख ४० हजार ६९३ रुपयांचा ऐवज लंपास केला.
यावेळी विनोद दत्तात्रय फडके यांच्या घरात प्रवेश करून त्यांची आई झोपेत असताना त्यांच्या गळ्यातील ९९ हजार ८५ रुपये किमतीचे मंगळसूत्र व मिनी गंठण गळ्यातून हिसकावून दोन अज्ञात चोरटे पसार झाले आहेत. मध्यरात्री ही घटना घडली आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच यवत पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे, सहायक फौजदार सागर चव्हाण व पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी त्यांनी परिसराची पाहणी केली. तपास यवत पोलीस करीत आहेत..
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Daund Crime : खामगाव येथे परप्रांतीय तरुणाचा धारदार हत्याराने गळा चिरून खून ; तर एकजण गंभीर जखमी
Daund Crime | सुनेची सासूला मारहाण, यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल