पुणे : सोशल मिडीयावर बदनामी करीत असल्याच्या संशयावरून तृतीयपंथीने आपल्या सहकाऱ्यांसह एका महिलेला मारहाण करून चपलांचा हार घातल्याचा धक्कादायक प्रकार केल्याची धक्कादायक घटना विश्रांतवाडी परिसरात नुकतीच उघडकीस आली आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी तृतीयपंथ्यासह १२ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सागर पोपट शिंदे उर्फ शिवलक्ष्मी संजय झाल्टे व त्याचे अनोळखी १२ सहकारी असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी ४० वर्षीय महिलेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या समाजमाध्यमावर वृत्तवाहिनी चालवितात. तर आरोपी शिवलक्ष्मी झाल्टे हा सुद्धा समाजमाध्यमावर एक वृत्तवाहिनी चालवितो. आरोपी झाल्टे याने अंधश्रद्धा पसरविण्यासाठीचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रसारित केला होता. हा प्रकार फिर्यादी महिलेच्या लक्षात आला. त्यानंतर तिने आरोपी झाल्टे हा अंधश्रद्धा पसरवित असल्याचा व्हिडीओ तिच्या युट्युब वाहिनीवर प्रसारित केली होती.
त्यानंतर फियादी महिलेनी आरोपी झाल्टे अंधश्रद्धा पसरवित असल्याचा व्हिडीओ युट्युब वाहिनीवर प्रसारित केली होती. या घटनेमुळे शिंदे व फिर्यादीचे वाद झाले होते. त्यावेळी फिर्यादी महिलेने आरोपी झाल्टे याची माफी मागितली होती.
दरम्यान, आरोपी झाल्टे याने फिर्यादी महिलेस पुन्हा एकदा माफी मागण्यासाठी विश्रांतवाडी येथील चौधरीनगर भागात बोलावून घेतले होते. तेथेच आरोपीने फिर्यादी महिलेस एका इमारतीच्या छतावर डांबून ठेवले आणि संबंधित महिलेला मारहाण केली होती. त्यानंतर महिलेला चपलांचा हार घालून ती माफी मागायला लावली. आणि याचा व्हिडीओ आरोपीने सोशल मिडीयावर प्रसारीत केला होता.
याप्रकरणी फिर्यादी महिलेनी आरोपी शिवलक्ष्मी संजय झाल्टे व त्याचे अनोळखी १२ सहकारी यांच्या विरोधात विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी १२ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तरी, पुढील तपास विश्रांतवाडी पोलिस करीत आहेत.