पुणे : पावसाळ्यात नको ते धाडस कसे जिवावर बेतू शकते याची प्रचिती देणारी एक घटना नागपूरमधून समोर येत आहे. नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात लोकांच्या डोळ्यासमोर एक वाहन पुराच्या पाण्यात वाहून गेले असून त्यात ६ ते ८ प्रवासी असल्याची भीती व्यक्त होत आहे.
नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील नांदागोमुख मार्गावरील पुलावरुन स्कार्पियो वाहन वाहुन गेल्याची घटना दुपारी ३ वाजता घडली.
प्राथमिक माहितीनुसार, नागपुरातील बामनमारी नदीला पूर आला आहे. या नदीच्या पुलावरुन एका चालकाने स्कॉर्पिओ नेली आणि पाण्याच्या प्रवाहात ती गाडी वाहून केली.
व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा :
या गाडीत एकूण सहा ते आठ प्रवासी असल्याची माहिती समोर आली आहे. गाडी वाहून जाताच गाडीतील प्रवाशांनी मदतीसाठी आक्रोश सुरू केला. काही अंतरावर जाऊन ही गाडी नदीच्या मधोमध पाण्यात अडकली.
गाडी वाहून गेल्याची माहिती मिळताच घटनास्थळी स्थानिक ग्रामस्थ, पोलीस आणि इतर प्रशासकीय अधिकारी दाखल झाले. त्यांनी मदत आणि बचावकार्य सुरू केले आहे. या गाडीतील काही प्रवासी वाहून गेल्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे.