सागर घरत
करमाळा, (सोलापूर) : करमाळा शहरातील देवीचा माळ रस्त्यालगत असलेले आयडीबीआय बँकेचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या साह्याने फोडल्याची घटना घडली आहे. रविवारी (ता. ०६) पहाटे हि घटना उघडकीस आली आहे. रहदारी असलेल्या ठिकाणी एवढी धाडसी चोरी पहाटे झाल्यानंतर आता बँकेच्या एटीएम बाबत सर्वत्र सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. Karmala News
मिळालेल्या माहितीनुसार, करमाळा शहरातील देवीचा माळ रस्त्यालगत आयडीबीआय बँकेचे एटीएम आहे. पहाटेच्या वेळी एक मोठी काळी गाडी बँकेसमोर उभा राहिली.. त्यातून तीन ते चार चोरटे काह्ली उतरून गॅस कटरच्या साह्याने एटीएमला उभे फाडून त्यातून लाखो रुपयांची रक्कम घेऊन पसार झाले. Karmala News
तसेच दरम्यान बँकेच्या सीसीटीव्ही वर काळा रंग असलेला स्प्रे टाकून निघून गेले. या सर्व प्रकारात केवळ दहा मिनिटांचा कालावधी जातो. यापूर्वीही असे प्रकार घडलेले असताना करमाळ्यात मात्र कोणत्याही एटीएम मध्ये एकही सुरक्षारक्षक नाही किंवा इतर कोणत्या प्रकारची सुरक्षा असावी असे नियोजन करण्यात आलेले नाही.
दरम्यान, एटीएम मधून किती रक्कम चोरी गेली याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नसली तरी यामध्ये दहा लाख पेक्षा जास्त रक्कम चोरी गेल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे. Karmala News