पुणे : राज्यातील वेगवेगळ्या भागात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून वारंवार चोरीच्या घटना उघडकीस येत आहेत . अशातचं आता हडपसर भागातील मांजरी परिसरात घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोकड, सोन्याचे दागिने असा ५ लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना घडली आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वैशाली रमेश देवकुळे ( वय 40, रा. लटके वडापाव दुकानाजवळ मांजरी, हडपसर ) यांचे घर बंद होते. चोरट्यांनी मध्यरात्री घराचे कुलूप तोडून कपाटातील सोन्याचे दागिने, रोकड असा ऐवज चोरून नेला. गुरुवारी देवकुळे बाहेरगावाहून परतल्या. तेव्हा घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर त्यांनीहडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.पोलीस हवालदार शिंगाडे यांचा अधिक तपास करत आहेत.